Pimpri Chinchwad Heat Wave: पिंपरी-चिंचवडमध्ये उष्णतेचा कहर; तापमान 40.7 अंशांवर

उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण; दुपारी रस्त्यांवर तुरळक गर्दी, थंड पेयांना मोठी मागणी
Heatwave
HeatwavePudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवार (दि. 11) 40. 7 कमाल तापमानाची नोंद झाली. वाढलेल्या तापमानामुळे शहरवासीयांना घाम फुटला आहे. दिवसभर उन्हाच्या झळा आणि रात्री घामाघूम अवस्थेमुळे शहरवासीय हैराण झाले आहेत.

Heatwave
PCMC Establishment Expenses: महापालिकेवर मनुष्यबळाचा आर्थिक बोजा; पीसीएमसीचा आस्थापना खर्च धोक्याच्या उंबरठ्यावर

नागरिक उष्णतेची लाट ओसरण्याची वाट पाहत आहेत. सकाळी नऊ वाजताच उन्हाच्या काहिलीने नकोसे वाटत आहे. दहानंतर कामासाठी बाहेर पडणाऱ्यांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दुपारी 12 नंतर रस्त्यावर तुरळक गर्दी दिसत आहे. नागरिकदेखील दुपारी कामे करणे शक्यतो टाळत आहेत.

Heatwave
PCMC STP Action Housing Societies: पिंपरी-चिंचवडमध्ये 24 सोसायट्यांचे नळजोड तोडले

सकाळी नऊ वाजल्यापासून नागरिकांची घामाघूम अवस्था होत आहे. सतत पंखे, कुलर यांची हवा देखील दमट वाटत आहे. नागरिक गारव्याच्या शोधात उद्याने, मोकळी मैदाने आणि तलावासारख्या ठिकाणी गर्दी करत आहेत.

Heatwave
Pimpri Chinchwad Drain Cleaning Monsoon Risk: पिंपरी-चिंचवडमध्ये नाले तुंबले; पावसाळ्यात पूराचा धोका वाढला

सावलीमध्ये बसणाऱ्यांनादेखील उन्हाच्या तीव झळा लागत आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. तापमान 38 ते 40 अंशाच्या दरम्यान असल्याने दुकानचालकदेखील दुपारी दुकाने बंद ठेवण्यास प्राधान्य देत आहेत.

Heatwave
Indrayani River Pollution: देहूगावातील इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात

नागरिक उन्हामध्ये बाहेर पडताना स्कार्फ, टोपी, गॉगल, छत्री यांचा वापर करत आहेत. थंड पेयांना मागणी वाढली आहे. उन्हाळा सुसह्य करण्यासाठी थंडावा देणारा आहार आणि पेयांचा आधार घेतला जात आहे. सुती, पांढऱ्या, हलक्या रंगाच्या कपड्यांचा वापर केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news