MSRTC Smart Card Pudhari
पिंपरी चिंचवड

ST NCMC Smart Card Helpline: एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी हेल्पलाइन सुरू; प्रवाशांच्या तक्रारींचे होणार निवारण

कार्ड ॲक्टिव्हेशन, टॉपअप, बॅलन्स तपासणीसह तांत्रिक अडचणींवर मिळणार मदत

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: नॅशनल कॉमन मोबिलिटी स्मार्ट कार्डच्या (एनसीएमसी) वापरासंदर्भात प्रवाशांना जाणवणाऱ्या समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळामार्फत हेल्पलाइन क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत.

एसटी महामंडळाने शासन निर्देशानुसार विविध सामाजिक घटकांतील प्रवाशांना प्रवास भाड्यात सवलत तिकीटासाठी एनसीएमसी कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कार्डची नोंदणी व वितरण करण्यासाठी मे. ईबिक्स टेक्नॉलॉजिस लिमिटेड यांच्यामार्फत एसटी महामंडळाचे आगार, बसस्थानके तसेच अधिकृत एजंटची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील बसस्थानकांवर सध्या कार्डचे नोंदणीकरण व वितरण करण्याची कार्यवाही सुरू आहे.

एसटी बसने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे; मात्र प्रवासादरम्यान बहुतांश प्रवाशांना एमसीएमसी कार्ड ॲक्टिव्हेशन, कार्डमध्ये रक्कम टॉपॲप करणे, कार्डमधील उपलब्ध बॅलन्स तपासणे तसेच कार्डच्या वापराबाबत इतर तात्रिंक समस्या उद्भवत आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी व तक्रारींचे निवारण करण्याच्या दृष्टीने एनएसडीएल पेमेंट‌्स बॅंकेमार्फत हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

येथे करा तक्रार

एनसीएमसी कार्ड वापरताना कोणतीही समस्या अथवा तक्रार उद‌्भवल्यास प्रवाशांनी ९१-२२-४२०२२१९० , ०१२२-६९७८७३०३ या हेल्पलाइन क्रमाकांवर संपर्क साधावा. कार्ड कार्ड ॲक्टिव्हेशन, टॉपअप उपलब्ध बॅलन्स तपासणी किंवा कार्डशी संबंधित इतर अडचणींबाबत आवश्यक ती मदत या माध्यमातून घेता येणार आहे.

एनसीएमसी कार्डच्या सुविधेचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा. तसेच कार्ड वापरताना काही समस्या आल्यास ती सोशल मीडियावर प्रसारित न करता अधिकृत हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.
रोहन देसाई, जनसंपर्क अधिकारी. एस.टी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT