Pimpri Chinchwad BJP Employment Mathadi Meet: पिंपरीत भाजपचा आज ‘रोजगार-माथाडी’ मेळावा; रवींद्र चव्हाणांची उपस्थिती

तरुणांशी संवाद, नगरसेवकांची आढावा बैठक आणि पक्षसंघटनेवर चर्चा; ऑटो क्लस्टरमध्ये माथाडी महामेळावा
Employment Fair
Employment FairPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: जेन-झी युगातील तरुणांनी भाजपपासून दुरावू नये, त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपने नोकरी मेळावा, माथाडी मेळावा तसेच खासगी बैठकांचे सत्र आयोजित केले आहे. नोकरीच्या निमित्ताने तरुण पक्षाशी जोडला जावा, असा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. जेन झी संदर्भातील प्रश्नांसोबत नव्या दमाच्या नगरसेवकांशी संवाद तसेच, माथाडीचा मेळावा व इतर उपक्रमांचे मंगळवार (दि. २९) आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वत: उपस्थित राहून पक्षशिस्तीचे धडे देणार आहेत.

Employment Fair
Pimpri Chinchwad Public Toilets: पिंपरी-चिंचवडमध्ये ३० लाखांवर लोक; सार्वजनिक शौचालयांची संख्या मात्र अपुरी!

महापालिकेत दुसर्‍यांदा भाजपची सत्ता आली असून, त्याला सहा महिने झाले आहेत. मात्र, विविध महापालिका सभा, स्थायी समिती सभांचे कामकाज सुरळीतपणे चालत नसल्याचे चित्र आहे. भाजपचे चारही आमदार आणि महापौर रवी लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, कोअर कमिटी यांच्यात अनेक प्रश्नांवर एकवाक्यता नसल्याचे दिसून आले आहे.

Employment Fair
Pimpri Chinchwad Maitri Clinic: पिंपरी-चिंचवडमधील ‘मैत्री क्लिनिक’ ठरतेय किशोरवयीन मुलांचा विश्वासाचा आधार

एकूण 14 बोगस उपसूचनांद्वारे 60 कोटी 18 लाख रुपयांची बिले परस्पर ठेकेदारांना अदा करणे. दहा स्वीकृत नगरसेवकांची निवड, सर्वसाधारण सभेचे लाईव्ह प्रक्षेपण, मोशी कचरा डेपोतील दुर्घटना आणि कचरा प्रश्न अशा विविध विषयांवर परस्पर विरोधी भूमिका मांडली जात आहे. पक्षात असलेल्या गटतटामुळे वेगवेगळी प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे नाहक भाजपची बदनामी होत आहे. सत्ता टिकवण्याबरोबरच पक्षांतर्गत शिस्त आणि समन्वय राखण्याचे आव्हान आहे. त्यामुळे यापूर्वी प्रदेश समितीने शहर पदाधिकार्‍यांचे कान टोचले होते. कोअर कमिटीत त्यावरून गरमागरम चर्चा झाली होती.

या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना पक्षाची विचारधारा, संघटनात्मक शिस्त आणि महापालिकेच्या कारभाराचे धडे देण्यासाठी तसेच, शहरात पक्षाची प्रतिमा उंचावण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. सेवा सप्ताहअंतर्गत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथील आंदोलनामुळे दुरावलेला जेन-झीना पक्षाने साद घातली आहे.

Employment Fair
Golden Guys Mercedes Car: ‘गोल्डन गाईज’च्या मर्सिडीजवर वाहतूक पोलिसांची कारवाई; ६,५०० रुपयांचा दंड

नवी सांगवी आणि चिंचवडच्या ऑटो क्लस्टर येथील रोजगार मेळाव्यात तरुणांनी नोकरीची संधी दिली जाणार आहे. नोकरी देऊन त्यांना पक्षाशी जोडले जाणार आहे. तसेच, माथाडी कामगारांचा मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. अशिक्षित तरुणांना पक्षांचे ध्येयधोरणांची माहिती दिली जाणार आहे. नवख्या तरुण नगरसेवकांना पक्षाच्या कामकाजाचे धडेही दिले जाणार आहेत. या माध्यमातून भाजपचे ध्येय -धोरण तरुणांईपर्यंत पोहचण्याचा संकल्प आहे.

कोअर कमिटीची आज बैठक

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मंगळवार (दि. २९) पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. ते सकाळी कासारवाडी येथील हॉटेल कलासागर येथे कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. महापालिकेतील कामकाज, पक्षसंघटना उपक्रम आढावा घेणार आहेत, असे भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.

Employment Fair
Pimpri Vegetable Market Rates: पितृपंधरवड्यामुळे पिंपरीत भाज्यांचे दर वधारले; गावरान गवार २३० रुपयांवर

नगरसेवकांना प्रशिक्षण शिबिर

शहर पातळीवरील पक्षांतर्गत शिस्त आणि समन्वय राखण्यासाठी कोअर कमिटी केली आहे. या पार्श्वभूमीवर 84 नगरसेवकांना भाजप पक्षाची विचारधारा, संघटनात्मक शिस्त आणि महापालिकेच्या कामाचा धडा देण्यासाठी भाजपकडून निवासी प्रशिक्षण 5 व 6 ऑक्टोबरला भाईंदर, मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित केले आहे. पक्षाच्या सेवा सप्ताहानिमित्त मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मंगळवारी हे शहरात आहेत. त्यासंदर्भात नगरसेवकांची सोमवारी (दि.28) आढावा बैठक घेण्यात आली, असे सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सांगितले.

असे आहेत कार्यक्रम

  • सकाळी नऊ : हॉटेल कलासागर येथे कोअर कमिटीची बैठक

  • सकाळी अकरा : आ.शंकर जगताप आयोजित नवी सांगवीतील न्यू मिलेनियम स्कूल येथे रोजगार महाकुंभचे उद्घाटन

  • दुपारी एक : आमदार उमा खापरे आयोजित ऑटो क्लस्टर येथे महाकुंभ मेळाव्याचे उद्घाटन

  • दुपारी दोन : अनुप मोरे आयोजित चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे राज्यस्तरीय माथाडी मेळाव्याचे उद्घाटन

  • सकाळी नऊ ते दुपारी दोन : प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आ. शंकर जगताप, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आ. महेश लांडगे यांच्या निवासस्थानी भेट; तसेच पक्ष आणि खागसी बैठका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news