Passport  Pudhari
पिंपरी चिंचवड

Pune Pimpri Passport Applications: पुणे विभागात पासपोर्ट अर्जांचा विक्रमी वाढ; पाच लाखांहून अधिक अर्ज प्राप्त

कोरोनानंतर परदेशवारीची क्रेझ वाढली; 4.72 लाख पासपोर्टचे यशस्वी वितरण

पुढारी वृत्तसेवा

राहुल हातोले

पिंपरी: परदेशवारीसाठी पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत असून, पुणे विभागात आतापर्यंत सुमारे पाच लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी चार लाख 72 हजार 639 पासपोर्टचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे.

कोरोनानंतर परदेशवारीची क्रेझ वाढली असून, 2021 च्या तुलनेत 2025 मध्ये दुप्पट अर्ज विभागाला प्राप्त झाले आहेत. 2024 मध्ये 4 लाख 55 हजार 160 जणांनी पासपोर्टसाठी अर्ज केले होते. तर, 2025 मध्ये 5 लाख 8 हजार 528 जणांनी अर्ज केले आहेत.

परदेश प्रवास, शिक्षण, नोकरी तसेच वैद्यकीय कारणांसाठी नागरिकांकडून पासपोर्टची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. शिक्षण, रोजगार आणि पर्यटनासाठी परदेशात जाणार्या नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पासपोर्ट काढण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला दिसून येतो. विशेषतः तरुण वर्गात पासपोर्टसाठी मोठी उत्सुकता आहे.

एजंटांचा सुळसुळाट रोखण्यासाठी उपाय

पासपोर्ट काढताना एजंटांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, अपॉइंटमेंट प्रणाली, ओपन हाऊस उपक्रम राबविले जात आहेत. यामुळे नागरिकांना थेट कार्यालयात मार्गदर्शन मिळत आहे. पासपोर्ट काढण्याची सुलभ प्रक्रिया ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा अपॉइंटमेंटनुसार वेळेवर सेवा कागदपत्रांची तपासणी जलद गतीने पोलिस पडताळणीसाठी समन्वयायामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचत असून, प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली आहे.

पासपोर्ट कार्यालयात वाढलेली गर्दी

पासपोर्ट कार्यालयांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती दिसून येत आहे. कार्यालयीन कर्मचारी आणि यंत्रणेमार्फत नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT