Pimpri IT Employee Suicide: चऱ्होलीत आयटी कर्मचाऱ्याचे विष प्राशन करून आत्महत्या

चऱ्होली बुद्रुकच्या कुमार ऐश्वर्य (39) यांनी तणावामुळे विष प्राशन केले; दिघी पोलिस तपास करत आहेत
Suicide case
Suicide case Pudhari
Published on
Updated on

पिंपरी: माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनीत नोकरीला असलेल्या एका व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना चऱ्होली येथे घडली.

Suicide case
Pimpri Chinchwad BJP Ravi Landge Mayor: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर म्हणून रवी लांडगे यांची एकमताने निवड

कुमार ऐश्वर्य (39, रा. चऱ्होली बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. दिघी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनायक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार ऐश्वर्य हे खराडी येथील एका आयटी कंपनीत नोकरीला होते. त्यांनी 29 जानेवारी रोजी विष प्राशन केले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रविवारी (दि. 1) रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

Suicide case
PMPML Bus Breakdown: देहूरोड मार्गावरील पीएमपीएमएल बस क्रमांक 364 वारंवार बंद; प्रवाशांची गैरसोय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार ऐश्वर्य यांची पत्नी प्रीती ऐश्वर्य या रिअल इस्टेटचे काम करतात. त्यांच्यावर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे कुमार हे तणावात होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून कुमार ऐश्वर्य यांनी टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन केले, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तपास दिघी पोलिस करत आहेत.

आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुमार यांच्या पत्नीवर ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधितांचे जबाब नोंदणी करण्यात येत असून तपास सुरू आहे.

विनायक पाटील, पोलिस निरीक्षक, दिघी पोलिस ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news