Pimpri Chinchwad New Municipal Building: पिंपरी-चिंचवडचे नवे महापालिका भवन अंतिम टप्प्यात

8.65 एकर जागेवर 312 कोटींचा प्रकल्प; जून 2027 पासून स्मार्ट कारभाराची तयारी
Pimpri Chinchwad New Municipal Building
Pimpri Chinchwad New Municipal BuildingPudhari
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवीन महापालिका भवन चिंचवड येथील सायन्स पार्क व डी मार्टशेजारी तयार होत आहे. येत्या सहा महिन्यांत त्या इमारतींचे काम पूर्ण होणार आहे. उर्वरित कामे व फर्निचरचे काम झाल्यानंतर म्हणजे पुढील वर्षी नवीन कारभारांना त्या नव्या कोऱ्या इमारतींमधून स्मार्ट कारभार सुरू करता येणार आहे.

Pimpri Chinchwad New Municipal Building
Pimpri Chinchwad Standing Committee President: पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदावर सस्पेन्स कायम

8.65 एकर जागेत नवीन महापालिका

पिंपरी येथील महापालिकेची इमारत दैनंदिन कामकाजासाठी अपुरी पडत आहे. सध्याच्या चार मजली इमारतीमध्ये जागा नसल्याने अनेक विभागांचे इतर ठिकाणी कार्यालये आहेत. एलबीडी, उद्यान, क्रीडा, पशुवैद्यकीय, स्मार्ट सिटी, झोपडपट्टी निर्मुलन पुनर्वसन, प्राधिकरण विशेष कक्ष, सुरक्षा, भूमि अभिलेख, गोदाम आदी विभागांचे कार्यालये इतर ठिकाणी आहेत. चिंचवड येथील महापालिकेच्या 33.86 एकर जागेपैकी 8.65 एकर जागेत नवीन महापालिका भवन उभारण्यात येत आहे. 18 मजली दोन आणि 6 मजली दोन अशा चार इमारती बांधण्यात येत आहेत. त्यासाठी 312 कोटी 20 लाख रुपये खर्च करण्यात येत आहे.

Pimpri Chinchwad New Municipal Building
Pimpri IT Employee Suicide: चऱ्होलीत आयटी कर्मचाऱ्याचे विष प्राशन करून आत्महत्या

बांधकाम जानेवारी 2023 मध्ये सुरू झाले असून, 18 पैकी 16 मजल्यापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. तसेच, सहा मजली इमारतींचे बांधकाम जवळजवळ होत आले आहे. इमारतीला प्लास्टर करण्यात येत आहे. कामाची मुदत जुलै 2025 पर्यंत आहे. तोपर्यंत संपूर्ण इमारतींचे काम पूर्ण होईल. त्यासोबत विद्युतविषयक कामही सुरू करण्यात आले असून, तेही या मुदतीमध्ये पूर्ण केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर इमारतीच्या आवारातील एसटीपी, पाण्याची टाकी, ड्रेनेज आणि फर्निचरचे काम केले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र दोन निविदा काढून काम केले जाणार आहे. त्या कामास 10 ते 12 महिन्यांचा कालावधी म्हणजे जून 2027 पर्यंत लागू शकतो. या चारही इमारती कामकाजासाठी तयार होतील. त्यानंतर महापालिकेचा संपूर्ण कामकाज या नव्या कोऱ्या इमारतींमधून सुरू करता येईल. महापालिकेचे नवीन कारभाऱ्यांचे स्मार्ट कामकाज तेथून सुरू होईल, असे सांगितले जात आहे.

पर्यावरणपूरक इमारत

शाश्वत विकासाच्या दृष्टीने ही इमारत इंटिग््रेाटेड हॅबिटॅट असेसमेंटसाठी 5 स्टार ग््राीन रेटिंग आणि आयजीबीसी प्लॅटिनम रेटिंग (पर्यावरणपूरक प्रमाणपत्र) मिळवण्याच्या दृष्टीने बांधण्यात येत आहे. सौरऊर्जा, पाणी पुनर्वापर प्रणाली व ग््राीन स्पेसेस यांसारख्या वैशिष्ट्‌‍यांमुळे पर्यावरणपूरक वातावरण टिकवून ठेवण्यास इमारतींमध्ये सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे इमारतींमध्ये दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश तसेच, नैसर्गिक हवा खेळती राहणार आहे. सौरऊर्जा पॅनेलवर वीज निर्मिती केली जाणार आहे. पाण्याचा पुर्नवापर केला करण्यात येणार आहे.

Pimpri Chinchwad New Municipal Building
Pimpri Chinchwad BJP Ravi Landge Mayor: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर म्हणून रवी लांडगे यांची एकमताने निवड

सर्व विभाग एका छताखाली येणार

या ठिकाणी 6 ते 18 मजल्यांच्या चार इमारती आहेत. प्रत्येक इमारतीला 3 तळघरे (बेसमेंट) आहे. येथे नागरी सेवा केंद्र, बहुउद्देशीय हॉल, ई-गव्हर्नन्स सेंटर, ग््रांथालय, क्लिनिक, वाचनालय, प्रदर्शन हॉल, संग््राहालय, बहुउद्देशीय हॉल, भव्य सहभागृह, पत्रकार कक्ष असणार आहे. नगरसेवक संख्या वाढ लक्षात घेऊन भव्य सभागृह व दालने उभारण्यात आले आहे. चारचाकी 479 आणि दुचाकी 2 हजार 713 वाहने पार्क करता येईल, असे वाहनतळ असणार आहे. एकूण 16 लिफ्टची सुविधा असणार आहे. पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर इमारत असल्याने ती नागरिकांसह, नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोईस्कर ठरणार आहे. चिंचवड मेट्रो स्टेशनही जवळच असणार आहे. एकाच इमारतींमध्ये महापालिकेचे सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी बसू शकतील, अशी क्षमता आहे. सर्व विभागांचे कामकाज येथून चालणार असल्याने सर्व विभाग एका छताखाली येणार आहेत. विविध विभागांत एकूण 2 हजार 689 अधिकारी व कर्मचारी बसू शकतील इतकी आसन व्यवस्था असणार आहे.

अजितदादांचा पुतळा सिटी सेंटरच्या जागेत

नवीन महापालिका भवनासमोर दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पुतळा असणार नाही, तर डी मार्टशेजारी असणाऱ्या खाणीच्या जागेत तो पुतळा उभारण्याचे नियोजन आहे. पुतळ्याची उंची 22 मीटर इतकी असणार आहे. त्या भोवती आकर्षक विद्युत रोषणाईने सुशोभीकरण केला जाणार आहे. तसेच कारंजे असणार आहेत. त्या कामासाठी स्वतंत्र निविदा काढली जाणार आहे. त्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यामुळे त्या जागेत उभारण्यात येणारा सिटी सेंटर हा आंतराष्ट्रीय व्यापारी संकुल प्रकल्प रद्द केला जाऊ शकतो.

Pimpri Chinchwad New Municipal Building
PMPML Bus Breakdown: देहूरोड मार्गावरील पीएमपीएमएल बस क्रमांक 364 वारंवार बंद; प्रवाशांची गैरसोय

सध्याच्या महापालिका भवनास झाले 39 वर्षे

सध्याच्या महापालिका भवनाच्या इमारतीचे उद्घाटन 13 मार्च 1987 रोजी तत्कालिन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते झाले. त्या इमारतीस 39 वर्षे झाली आहेत. या कालावधीत शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. सन 1981 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 2 लाख 49 हजार 364 होती. आता ती 30 लाखांच्या पुढे गेली आहे. शहराला लागून असलेली माण, मारुंजी, हिंजवडी, जांबे, सांगवडे, नेरे, गहुंजे तसेच, कळस, दिघी आणि देहू रोड कॅन्टोन्मेंटचा नागरी भाग महापालिकेत समाविष्ट करण्याचे नियोजन आहे. त्या गावाची तसेच, शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेतल्यास पालिकेवर नागरी सेवा व सुविधा पुरविण्याचा ताण पडणार आहे. त्यासाठी नवीन भव्य इमारती उभारण्यात येत आहे.

जून 2027 पर्यंत इमारत सज्ज करण्याचे नियोजन

इमारतीचे काम वेगात सुरू आहे. जुलै 2026 पर्यंत चारही इमारतींचे बांधकाम पूर्ण होईल. तसेच, विद्युतविषयक कामेही केली जातील. इमारतीच्या आवारातील कामे आणि फर्निचरचे कामासाठी स्वतंत्र दोन निविदा काढण्यात येणार आहेत. ते काम वर्षभरात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नव्या प्रशासकीय कामकाज सुरू करण्यासाठी इमारतीचे सर्व काम जून 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, असे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news