PCMC
PCMCPudhari

Pimpri Chinchwad Standing Committee President: पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदावर सस्पेन्स कायम

महापौर, उपमहापौर व सत्तारूढ पक्षनेते ठरले; मार्चमध्ये समिती सदस्यांची निवड, अध्यक्षपदावर सर्वांचे लक्ष
Published on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर व उपमहापौरपद तसेच, सत्तारूढ पक्षनेतेपदाचे वाटप झाले आहे. तरी स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार, याबाबत मात्र अद्याप सस्पेन्स कायम आहे. ते पद कोणत्या गटाकडे जाणार, याबाबत चर्चांना उत आला आहे. समितीच्या 16 सदस्यांची निवड मार्च महिन्यात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

PCMC
Pimpri IT Employee Suicide: चऱ्होलीत आयटी कर्मचाऱ्याचे विष प्राशन करून आत्महत्या

महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले रवी लांडगे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. तर, उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलेल्या शर्मिला बाबर या पिंपरी विधानसभा मतदारसंघातून येतात. सत्तारूढ पक्षनेते झालेले प्रशांत शितोळे हे चिंचवड मतदारसंघातील आहेत. त्यामुळे भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या तीनही विधानसभा मतदारसंघांना प्रत्येकी एक महत्त्वाचे पद देण्यात आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

PCMC
Pimpri Chinchwad BJP Ravi Landge Mayor: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर म्हणून रवी लांडगे यांची एकमताने निवड

या पार्श्वभूमीवर आता महापालिकेतील सर्वांधिक महत्त्वाचे समजले जाणारे स्थायी समितीचे अध्यक्षपद कोणाच्या वाट्याला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आर्थिक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या पदासाठी कोणाची निवड होते, यावर आगामी काळातील विकासकामांची दिशा ठरणार असल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

PCMC
PMPML Bus Breakdown: देहूरोड मार्गावरील पीएमपीएमएल बस क्रमांक 364 वारंवार बंद; प्रवाशांची गैरसोय

तीनही मतदारसंघांचा समतोल साधण्याचा प्रयत्न झाल्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्षपद चौथ्या नेतृत्वाला दिले जाणार की, याच तिन्ही मतदारसंघांपैकी एखाद्यालाच पुन्हा एक अतिरिक्त जबाबदारी दिली जाणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा पुढील निर्णय कोणता असेल, याकडे महापालिकेतील सर्वांची नजर लागली आहे.

PCMC
Charholi Bridge Closure: चऱ्होली पूल बंद; वाहतूक, उद्योग व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय

दरवर्षीच्या परंपरेनुसार महापालिकेचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महापालिका लेखा विभागाचे नियोजन आहे. त्यापूर्वी स्थायी समितीची गठण होणे आवश्यक आहे. त्यानुसार, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीच्या 16 जणांची निवड केली जाईल. त्यात भाजपचे 11, राष्ट्रवादी काँग््रेासचे 4 आणि शिवसेनेचा (एकनाथ शिंदे) एक सदस्य असणार आहे. तसेच, स्थायी समितीचा अध्यक्ष निवडला जाईल.

येत्या शुक्रवारी (दि. 6) महापौर व उपमहापौर पदाची निवड होईल. त्यानंतर ती विशेष सर्वसाधारण सभा तहकूब केली जाईल. त्यानंतर स्थायी समितीच्या सदस्यांची निवड करण्यासाठी विशेष सभा महापौरांच्या अध्यक्षतेखाली बोलावली जाईल. त्यात भाजप, राष्ट्रवादी काँग््रेास व शिवसेनेच्या सदस्यांची निवड केली जाईल. त्यानंतर स्थायी समितीचे गठण होईल. त्यानंतर स्थायी समितीचा अध्यक्ष निवडला जाईल.

मुकेश कोळप, नगर सचिव, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news