पिंपरी: पुणे मेट्रो 3 अर्थात माण-हिंजवडी आयटी पार्क ते शिवाजीनगर हा मार्गाची अंतिम आणि महत्त्वपूर्ण चाचणी नुकतीच पूर्ण झाली आहे. या मार्गावरती सिग्नल यंत्रणेचे आणि सुरक्षा तपासणीचे काम अपूर्ण होते; मात्र संबंधित ठेकेदाराला पीएमआरडीए आयुक्तांनी तंबी दिल्यानंतर आता कामाचा वेग वाढला आहे. दरम्यान, मे 2026 अखेरपर्यंत धावण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.
मेट्रोलाईन 3’ चे काम अंतिम टप्प्यात असून, महानगराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडणार असून, सार्वजनिक वाहतूक सेवा आणखी सक्षम होणार आहे. आयटी हब हिंजवडीपासून पुण्याच्या मध्यवर्ती भागापर्यंतचा प्रवास आता अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
दरम्यान, प्राधिकरणाच्या आयुक्तांनी मेट्रोबाबत आढावा घेण्यात आला होता. या वेळी संबंधित कंत्राटी कंपनीला कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच, अभियांत्रिक विभागाच्या वतीने मेट्रोला त्या संबंधित पत्रदेखील दिले होते. प्रत्यक्षामध्ये डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करून मार्चमध्ये हा मार्ग धावणे अपेक्षित होता.
मात्र, स्टेशनचे काम अपूर्ण असल्याचे सांगून ही मेट्रोसेवा सुरू करा नव्हती. मात्र, आता या कामापैकी महत्त्वाचे असे सिग्नल यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्थित तपासणीदेखील पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठळक मुद्दे:
मे 2026 पर्यंत पहिल्या टप्प्यातील 12 स्थानके खुली
प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण
सिग्नलिंगची तांत्रिक चाचणी व सुरक्षा तपासणी
शिवाजीनगर ते हिंजवडी अंतर काही मिनिटांत पार
सार्वजनिक-खासगी भागीदारीतील
(झझझ) देशातील पहिली मेट्रोलाईन