PMRDA Disaster Response Team Pudhari
पिंपरी चिंचवड

PMRDA Disaster Response Team Monsoon: पुणे महानगर क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापन सज्ज; पीडीआरएफ आणि अग्निशमन दल २४x७ अलर्ट मोडवर

पावसाळ्यात पूर, दरडी आणि भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन पीएमआरडीएची तयारी पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर, भूस्खलन, दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि रस्ते खचणे यांसारख्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) अंतर्गत कार्यरत पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद पथक (पीडीआरएफ) आणि अग्निशामक दल पूर्णपणे सज्ज झाले आहे.

मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा 24 तास पुणे महानगर क्षेत्रात तत्पर राहणार आहे. आपत्तीप्रसंगी नागरिकांनी पीडीआरएफ दलाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांसाठी आवाहन

नागरिकांना मुसळधार पावसात डोंगरउतार, दरडीप्रवण भाग, कड्यांच्या पायथ्याशी किंवा वेगाने वाहणारे नाले व पूरग्रस्त रस्ते ओलांडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. जमिनीत भेगा, झाडे किंवा वीज खांब झुकणे, दगड घसरणे किंवा घरांना तडे जाणे अशी भूस्खलनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यास तातडीने सुरक्षित स्थळी जाऊन प्रशासनाला माहिती द्यावी. आपत्ती घडल्यानंतर बचावकार्य करण्यापेक्षा आपत्तीपूर्व जनजागृती, सतर्कता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक महत्त्वाच्या आहेत. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि प्रशासनाशी वेळेवर समन्वय साधल्यास मोठी जीवितहानी टाळता येऊ शकते.

देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पीएमआरडीए (आपत्कालीन संपर्क) पीडीआरएफ नियंत्रण कक्ष : 9545282930

ठळक मुद्दे:

  • पूर, भूस्खलन आणि दरडीप्रवण भागांसाठी विशेष तयारी.

  • 30 सदस्यांचे पीडीआरएफ पथक आणि अत्याधुनिक बचाव साहित्य सज्ज.

  • नागरिकांसाठी २४ बाय ७ नियंत्रण कक्ष कार्यरत.

प्रतिबंधात्मक उपायांवर भर:

  • संवेदनशील डोंगरउतार आणि घाट रस्त्यांचे सातत्याने निरीक्षण.

  • अतिवृष्टीचा इशारा मिळताच नागरिकांना तातडीने सतर्क करणे.

  • आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतर.

  • बोटी, रोप रेस्क्यू साहित्य, कटिंग उपकरणे आणि प्रशिक्षित पथके सज्ज.

  • ग्रामपंचायत, महसूल, पोलिस व आरोग्य विभागाच्या समन्वयाने मॉक ड्रिल्स पूर्ण.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT