Pimpri Chinchwad Rain Update: पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची जोरदार हजेरी; तापमानात घट, सखल भागात पाणी साचले

रिमझिम ते मुसळधार पावसाचा परिणाम; शहराचे तापमान ३३ वरून २८ अंशांवर
Rain
RainPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहर परिसरात बुधवार (दि. १) पहाटेपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली; मात्र दुपारी दोननंतर पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. शहराच्या कमाल तापमानात घट झाली असून, दररोज ३३ ते ३५ अंशादरम्यान असणारे तापमान २८ अंश इतके नोंदविले गेले. शहरात दिवसभरात ११. ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Rain
Chakan Extortion Case Arrest: चाकणमध्ये खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांचा फिल्मी स्टाईल सापळा

बुधवारी पहाटेच्या दरम्यान सुरू झालेल्या रिमझिम सरींनी सकाळी काही काळ विश्रांती घेतली. त्यानंतर दुपारी दोनपासून पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. पावसामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले होते. निगडी, आकुर्डी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, पिंपरी, चिखली, मोशी, भोसरी, चऱ्होली याठिकाणी पाणी साचल्यामुळे पादाचाऱ्यांची तारांबळ उडाली. पाऊस सुरू झाला तसे रस्त्यावरील खड्ड्यांनीदेखील डोके वर काढले आहे.

Rain
Frozen Bank Account Cyber Fraud: सायबर फसवणुकीत फ्रीज बँक खात्यांना दिलासा; I4C कडून नवीन GRM यंत्रणा लागू

सुरुवातीला रिमझिम आणि नंतर जोरदार पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांना आडोसा शोधावा लागला. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. उकडाही जाणवत होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. रस्त्यावरील पथारी, हातगाडीवाले यांच्या व्यवसायावर परिणाम झाला. पावसामुळे बाजार, भाजी मंडईमधील वर्दळ काहीशी रोडावली असल्याचे दिसून आले. सायंकाळी पाचनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतल्यामुळे रस्त्यावरील पाणी ओसरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news