Pimpri Chinchwad News: मर्जीनुसार प्रभागांची तोडफोड

भाजपाकडून सर्व दहा क्षेत्रीय समित्‍यांवर कब्जा; ताथवडे, संत तुकारामनगर दोन नवीन कार्यालये
PCMC
PCMCPudhari
Published on
Updated on

पिंपरी: मर्जीनुसार प्रभागांची तोडफोड करत सत्ताधारी भाजपाने नव्याने होणार्‍या सर्व दहा क्षेत्रीय कार्यालय समितीवर कब्जा मिळवला आहे. त्या दहा क्षेत्रीय कार्यालयांतून बुधवार (दि.1) पासून प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. तर, समिती अध्यक्षाची निवड 15 जुलैपर्यंत केली जाणार आहेत. त्या पदावर कोणत्या नगरसेवकांची वर्णी लागते, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 29 अ मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणानुसार क्षेत्रीय समितांची स्थापना केली जाते.

PCMC
HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेट नसल्यास कारवाई

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची कार्यक्षमता वाढविणे, नागरिकांना अधिक सुलभ व तत्परसेवा उपलब्ध करून देणे. वाढती लोकसंख्या व वाढलेला भौगोलिक कार्यक्षेत्राचा विस्तार विचारात घेता सध्या अस्तित्वात असलेले आठ क्षेत्रीय कार्यालये अपुरे ठरत आहेत.

प्रशासकीय सोयीसाठी व नागरिकाभिमुख सेवा अधिक परिणामकारकपणे देण्यासाठी महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयाचे पुनर्रचना करून एकूण 10 कार्यालये निर्माण करण्याची उपसूचना विरोधकांचा विरोध डावलून सत्ताधारी भाजपाने जून महिन्यातील सर्वसाधारण सभेत मंजूर केली.

त्या उपसूचनेच्या ठरावास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. त्यांनी 1 जुलैपासून सर्व दहा क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच, नवीन दोन क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय अधिकारी, अधिकारी व मनुष्यबळ नेमले आहे. त्यानुसार, बुधवारपासून सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे कामकाज सुरू आहे.

दरम्यान, प्रभागांची आपल्या सोईनुसार तोडफोड करत आठचे दहा क्षेत्रीय कार्यालये तयार केली आहेत. सर्व दहाही क्षेत्रीय कार्यालये भाजपाच्या ताब्यात राहावीत म्हणून ही खरबदारी घेण्यात आली आहे. क्षेत्रीय समिती अध्यक्षांची निवड 15 जुलैपर्यंत केली जाणार आहे. त्या पदावर कोणत्या नगरसेवकांची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे.

PCMC
Ketan Agarwal Case: लोहगडावर चेतन चौधरी कडून केतन अग्रवालच्या हत्येचा सीन रिक्रेशन

नवीन दहा क्षेत्रीय कार्यालयांतील प्रभाग आणि कार्यालयांचा पत्ता :

राजगड : अ क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 13, 14 आणि 15 चा समावेश आहे. ते कार्यालय सध्याचे निगडी, प्राधिकरण येथील भेळ चौक येथेच असणार आहे.

सिंहगड : ब क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमक 17, 18 आणि 19 चा समावेश करण्यात आला आहे. ते कार्यालय सध्या सुरू असलेल्या चिंचवडमधील एल्प्रो मॉलजवळ असणार आहे.

विजयदुर्ग : क क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 2, 9 आणि 10 असणार आहे. ते कार्यालय नेहरुनगर येथील मेजर ध्यानचंद पॉलिग्रास स्टेडिमयशेजारी आहे.

देवगिरी : ड क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 21, 27, 28 आणि 29 असे चार प्रभाग असणार आहेत. ते कार्यालय पूर्वीप्रमाणे रहाटणी येथे असणार आहे.

शिवनेरी : ई क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 3, 4 आणि 5 असणार आहे. ते कार्यालय पूर्वीप्रमाणे पांजरपोळ, भोसरी येथे असणार आहे.

तोरणा : फ क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 1, 11 आणि 12 चा समावेश आहे. ते क्षेत्रीय कार्यालय पूर्वीनुसार निगडीतील टिळक चौकात असणार आहे.

पुरंदर : ग क्षेत्रीय कार्यालयात 22, 23 आणि 24 हे तीन प्रभाग असणार आहेत. ते क्षेत्रीय कार्यालय पूर्वीप्रमाणे थेरगाव येथील पीसीपीएमसी-वेंगसरकर क्रिकेट अकादमी येथे असेल.

प्रतापगड : ह क्षेत्रीय कार्यालयात 30, 31 आणि 32 असे तीन प्रभाग असतील. ते कार्यालय पूर्वीप्रमाणे कासारवाडीतील महिला आयटीआय इमारतीत असणार आहे.

राजगड : ज क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 16, 25 आणि 26 असे तीन प्रभाग असतील. ते नवीन कार्यालय ताथवडे येथील महापालिकेच्या वाहनतळ येथे तयार करण्यात आले आहे.

लोहगड : ल क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक 6, 7, 8 आणि 20 असणार आहे. ते नवीन कार्यालय संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यासमोरील म्हाडाच्या इमारतीमध्ये तयार करण्यात आले आहे.

भाजपाच्या तीस कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून मिळणार संधी

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय समितीसाठी तीन स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी त्या क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात राहणारे व्यक्ती पात्र ठरते. दहा क्षेत्रीय कार्यालये 1 जुलैपासून अस्तित्वात येणार आहेत. भाजपाच्या एकूण 30 कार्यकर्त्यांना त्या पदावर संधी दिली जाणार आहे. त्यासाठी भाजपामधील इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. पक्षाच्या शहराध्यक्षांसह आमदारांकडे त्यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यासाठी वेगवेगळे फंडे राबवले जात आहेत.

समिती अध्यक्षांना मिळणार नवीन इलेक्ट्रिक वाहन

सर्व क्षेत्रीय समिती अध्यक्षांना महापालिकेकडून नवीन इलेक्ट्रिक वाहन मिळणार आहे. महापालिकेच्या नव्या धोरणानुसार यापुढे केवळ इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला जाणार नाही. इलेक्ट्रिक वाहने खरेदीस स्थायी समितीने मंजुरीही दिली आहे.

ड, ल क्षेत्रीयच्या क्षेत्रात सर्वाधिक चार प्रभाग

ड आणि ल क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक 4 प्रभागांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित आठ क्षेत्रीय कार्यालयात तीन प्रभागांचा समावेश करण्यात आला आहे. पूर्वी अस्तित्वात असलेली आठ क्षेत्रीय कार्यालये त्याच ठिकाणी असणार आहेत. नव्याने स्थापन झालेले ज आणि ल कार्यालय अनुक्रमे ताथवडे आणि पिंपरीतील संत तुकारामनगर येथे निर्माण करण्यात आले आहे.

पंधरा जुलैपर्यंत क्षेत्रीय समिती अध्यक्ष निवडणार

महापालिकेच्या सर्व दहा क्षेत्रीय कार्यालय समिती अध्यक्षपदी भाजपाचे नगरसेवक विराजमान होणार आहेत. ती प्रक्रिया येत्या 15 जुलैपर्यंत पूर्ण केली जाईल. तसेच, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांवर तीन स्वीकृत सदस्य निवडण्यात येणार आहे. त्यात पक्षाच्या 30 कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल, असे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news