Vegetable Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Vegetable Prices: पावसाचा भाज्यांच्या दरावर परिणाम; पिंपरीत गाजर ६०, लसूण २५० तर आले २०० रुपयांवर

लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत आवक घटल्याने दरवाढ; पालेभाज्यांचे भाव स्थिर, डाळिंबाची आवक वाढली

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवारी (दि. २३) गाजर, लसूण, आले यांची पावसामुळे आवक मंदावल्याने दर वाढले आहेत. भाजी मंडईत गाजर ६० रूपये, लसूण २२५ तर आल्याचा २०० रूपये प्रतिकिलो दर होता. पालेभाज्यांचे दर स्थिर होते.

पावसामुळे आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गाजर ६० रुपये, बीट ५०, वाटाणा ८०-१००, बीन्स ७०, राजमा ८०, वांगी ५०, गवार ८०, शेवगा ८०, दोडका ८०, फ्लॉवर ६०-७०, कोबी ५०, काकडी ४०, टोमॅटो ३०, शिमला ५०, मिरची ५०, लसूण २२५, आले २००, तोंडली ७०-८०, कांदा ४०-४५, बटाट्याचे २५-३० रुपये किलो दर होते. कोथिंबीर, मेथी, पालक, शेपूची जुडी १५-२० रूपयांना होती.

फळभाज्यांचे किलोचे दर पुढीलप्रमाणे (रुपयांत)

रविवारी बाजारात गवार ८० रूपये किलो, शेवगा ८०-९०, टोमॅटो ३०, भेंडी ६०, फ्लॉवर ६०, कोबी ५०, मिरची ५०, गाजर ५०, शिमला ५०, लसूण २२५-२५०, आले २००, वांगी ४०, काकडी ४०, कारले ६०, कांदे ३०-४०, बटाटा २५-३०, बिन्स ७०, पावटा ८०, लाल भोपळा ५०, घोसाळी ४०, दोडका ६०, तोंडली ६०, बीट ४०, दुधी ५०, घेवडा ७०.

पिंपरी बाजारातील पालेभाज्यांचे प्रतिजुडी दर (रुपयांत)

कोथिंबीर १५-२०, मेथी १५-२०, पालक १५-२०, शेपू १५-२०, राजगिरा २०, पुदिना १५, मुळा २५, चवळई, लाल माठ १५, हिरवा माठ १५, करडई २०, कांदापात २०, करडई १५, आळूपाने १०, आंबट चुका १५, गवती चहा १०.

फळभाज्यांचे किरकोळ बाजारातील किलोचे भाव (रुपयांत)

शेवगा ९०, गवार ९०,पावटा ८०, तोंडली ८०, बीट ४०-५०, दोडका ७०, कारली ७०, भरताची वांगी ५०, भेंडी ७०, मिरची ७०, फ्लॉवर ७०, कोबी ६०, वांगी ६०, घोसाळे ५०, पडवळ ५०, दुधी भोपळा ५०, पापडी ९०, पावटा ८०, परवल ८०, सुरण ९०, मद्रास काकडी ३०, आरबी 80, सिमला ७०, राजमा ८०, बिन्स ८०, गाजर ६०, आरवी ८०, रताळी ७०, टोमॅटो ४०.

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रुपयांत)

कांदा २५, बटाटा १५, लसूण १००, आले ६०, भेंडी ३०, गवार ६०, टोमॅटो १५, वाटाणा १००, घेवडा ९०, दोडका ५०, हिरवी मिरची ३०, दुधी भोपळा २५, काकडी १५, कारली ३०, गाजर ३०, फ्लॉवर ६०, कोबी ४०, ढोबळी ३५, वांगी २०, शेवगा ४५, घोसाळी ३०, लिंबू ४०, मका कणीस १००.

मोशी उपबाजारातील आवक (क्विंटलमध्ये)

फळभाजी ४६५२, पालेभाजी ५१५०० (गड्डी), फळे आवक ५६४. कांदा ६६७, बटाटा १२१०, लसूण २५, आले ३०, भेंडी १५५, गवार ८, टोमॅटो ६२०, वाटाणा २५, घेवडा ४३, दोडका ४५, हिरवी मिरची १३१, दुधी भोपळा ५७, काकडी १७५, कारली ६६, डांगर ६४, गाजर ४५, फ्लॉवर ३२७, कोबी १९४, वांगी १६१, ढोबळी १४४, बीट २७, शेवगा ९०, लिंबू ५२, मका कणीस ११२, तोंडली १३.

बाजारात डाळिंबाची आवक वाढली

पिंपरी फळ बाजारात डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. डाळिंबाचे प्रतिकिलो १००-१२० रुपये दर असल्याने याची मोठ्या प्रमाणात खरेदी करताना नागरिक दिसत होते. सध्या पावसाळ्यात हंगाम बहरल्याने स्वस्त दरात डाळिंब मिळत आहेत. ड्रगनफ्रुट, सफरचंद ही स्वस्त आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. बाजारात पपई ५०-६० रुपये किलो तर अननस प्रतिनग १००-१२० रुपये दराने उपलब्ध आहेत.

फळांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे (रुपयांत)

सफरचंद १००-१५०, मोसंबी १५०-२००, संत्री १५०, डाळिंब १००-१५०, पेरू १००, अंजीर १००, पपई ५०-६०, केळी ५०-६०, अननस १२० प्रतिनग, पिअर २६०, ड्रॅगनफ्रुट पांढरे १००, लाल ड्रॅगनफ्रुट १००, किवी १२०-१३०, चिकू ८०-१००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT