Vegetable Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Vegetable Market Rates: पिंपरी भाजी मंडईत घेवडा, शेवगा, ढोबळीची आवक वाढली; भाज्यांचे दर काहीसे नरमले

लालबहादूर शास्त्री मंडईत कोथिंबीर १५ रुपयांना जुडी; मोशी उपबाजारात हजारो क्विंटल भाजीपाल्याची आवक

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. २) फळभाज्यांमध्ये घेवडा, शेवगा, ढोबळीची आवक वाढली असून दरही कमी झाले आहेत. तर पालेभाज्यांच्या दरात चढ-उतार आहे. कोथिंबीरची जुडी १५ - २० रुपये दराने विक्री केली जात आहे, तर घेवडा ८० - ९० रुपये, शेवगा ९० व ढोबळी ८० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.

फळभाज्यांचे दर पुढील प्रमाणे :

रविवारी बाजारात गवार १२० रुपये किलो, शेवगा १२० रुपये, टोमॅटो ३०, भेंडी ७०, फ्लॉवर ५०, कोबी ३०, मिरची ७०, गाजर ४०, शिमला ७०, लसूण १८० - २०० रुपये प्रतिकिलो, आले १२० - १४०, वांगी ६०, काकडी ३०, कारले ७०, कांदे २५ - ३०, बटाटा २५ - ३०, बिन्स १००, पावटा ८०, लाल भोपळा ५०, घोसाळी ५०, दोडका ७०, तोंडली ७०, बीट ४०, दुधी ५०, घेवडा १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.

पिंपरी बाजारातील दर पालेभाज्यांचे दर (रु.) प्रति जुडी:

कोथिंबीर १५ रुपये, मेथी ३०, पालक २०, शेपू २०, राजगिरा २०, पुदिना १०, मुळा ३०, चवळई २०, लाल माठ २०, हिरवा माठ २०, करडई २०, कांदापात ३०, करडई २०, आळू पाने २० रुपये जुडी दराने विक्री केली जात आहे. आंबट चुका २० रुपये.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

शेवगा १२० रुपये, गवार १४०, पावटा ८० - १००, तोंडली १००, बीट ४० - ५० , दोडका ९०, कारली ८०, भरताची वांगी ६० - ७०, भेंडी ८०, मिरची ८०, फ्लॉवर ८०, कोबी ५०, वांगी ८०, घोसाळे ६०, पडवळ ६०, दुधी भोपळा ६०, पापडी १००, पावटा १००, सुरण ९०, मद्रास काकडी ३०, सिमला ८०, राजमा १०० - १३०, बिन्स १२०, गाजर ५०, रताळी ६०, टोमॅटो ४० रुपये.

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा १७, बटाटा १०, लसूण ७५, आले ९० , भेंडी २५, गवार ४०, टोमॅटो १५, वाटाणा १२०, घेवडा ३५, दोडका ३५, हिरवी मिरची ५५, दुधी भोपळा २५, काकडी १५, कारली ३५, गाजर २५, फ्लॉवर १२, कोबी ९, ढोबळी ३५, वांगी १५, शेवगा ४५, घोसाळी ३०, लिंबू २५, मका कणीस १०० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी ४९९३, पालेभाजी ४८३०० (गड्डी), फळे आवक ५५१, कांदा ६७८, बटाटा १११०, लसूण ५, आले ६२, भेंडी ११८, गवार ३६, टोमॅटो ५४५, वाटाणा ९, घेवडा २९, दोडका ६८, हिरवी मिरची १४३, दुधी भोपळा ८५, काकडी २२५, कारली ९७, डांगर ६२, गाजर १४६, फ्लॉवर ५६६, कोबी २१९, वांगी २३०, ढोबळी ७७, बीट १४, शेवगा ९३, लिंबू ८४, मका कणीस १६३, तोंडली २१, रताळी ८ क्विंटल इतकी आवक झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT