Wadgaon Talegaon Traffic Jam: वडगाव–तळेगाव महामार्गावर वाहतूक कोंडीचा कहर; ५ किमी अंतरासाठी लागताहेत ४५ मिनिटे

मुंबई-पुणे महामार्गासह पर्यायी मार्गही जाम; रुग्ण, विद्यार्थी आणि कामगार त्रस्त, कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी
Wadgaon Talegaon Traffic Jam
Wadgaon Talegaon Traffic JamPudhari
Published on
Updated on

वडगाव मावळ: मुंबई-पुणे महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून वडगाव मावळ ते तळेगाव दाभाडे दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. वडगावहून तळेगावाला जाण्यासाठी तब्बल अर्धा ते पाऊण तास वेळ लागत असल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

Wadgaon Talegaon Traffic Jam
Pimpri Chinchwad Wrong Side Driving: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘रॉंग साइड’ वाहनांचा कहर; ५० हजार चालकांवर कारवाई, ५.८६ कोटींचा दंड वसूल

पर्यायी मार्गही कोंडीत

वडगाव मावळ ते तळेगाव दाभाडे हे अंतर अवघे ५ किलोमीटर इतके असून, दोन्ही शहरांमध्ये कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. शाळा, कॉलेजमध्ये ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे वडगाव होऊन तळेगावला किंवा तळेगावहून वडगावला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दोन्ही शहरांमध्ये ये-जा करण्यासाठी मुंबई-पुणे महामार्ग हा अत्यंत सुलभ मार्ग आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून वडगाव शहरातील मुख्य प्रवेशद्वारापासून वडगाव तळेगाव फाटापर्यंत दिवसभर सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. याशिवाय पर्यायी मार्ग असलेल्या वडगाव-तळेगाव साखळी रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. तसेच, तळेगाव एमआयडीसी रस्त्यावरही वाहतूककोंडी होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

Wadgaon Talegaon Traffic Jam
Pimpri Chinchwad Voter Verification: पिंपरी-चिंचवडमध्ये मतदार पडताळणीला मंद प्रतिसाद; एसआयआर मोहिमेतील ७ दिवसांचे आव्हान

उपाययोजना करण्याची मागणी

या सर्वच मार्गांवर सातत्याने वाहतूककोंडी होत असल्याने वडगाव-तळेगाव या अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतरासाठी नागरिकांना तब्बल अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो. हा प्रकार दररोज होत असल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

Wadgaon Talegaon Traffic Jam
Pimpri Chinchwad E RTS Electric Bus: पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोला पर्याय? बीआरटी मार्गावर धावणार ई-आरटीएस इलेक्ट्रिक बस

ही वाहतूक कोंडी जीवावरही बेतू शकते?

दरम्यान, अत्यावश्यक उपचारासाठी आवश्यक असणारी रुग्णालये ही तळेगाव दाभाडे तसेच सोमाटणे फाटा या परिसरात आहेत. त्यामुळे वडगाव शहर व परिसरातील कान्हे, साते, जांभूळ, नायगाव, कामशेतपासून थेट आंदर मावळातील संपूर्ण भागातील नागरिकांना मोठ्या व अत्यावश्यक उपचारासाठी तळेगाव किंवा सोमाटणे या ठिकाणीच जावे लागते; परंतु या वाहतूक कोंडीमुळे अवघ्या पाच किलोमीटरसाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागत असल्याने रुग्णाला वेळेवर उपचार मिळू शकणार नाही. त्यामुळे वेळप्रसंगी या वाहतूक कोंडीमुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Wadgaon Talegaon Traffic Jam
PCMC Financial Crisis: पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक कोंडी; आता शासनाच्या अनुदानातून ५०० कोटींचे लक्ष्य

सोशल मीडियावर संताप

  • दरम्यान, सातत्याने होत असलेल्या या वाहतूक कोंडीला नागरिक वैतागले असून, आज तर दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे नागरिकांनी आज सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला.

  • वाहतूक कोंडीची मुख्य कारणे

  • तळेगाव एमआयडीसीमधून महामार्गाकडे येणारी-जाणारी अवजड वाहने

  • तळेगाव-चाकण रस्त्याने जुना महामार्ग किंवा द्रुतगती महामार्गाकडे जाणारी येणारी अवजड वाहने

  • मुंबई-पुणे महामार्गावरील दोन्ही बाजूंनी होणारी वाहतूक

  • वडगाव-तळेगाव फाटा येथे अपेक्षित नियोजनाचा अभाव

  • पावसाळ्यामुळे पर्यटकांची वाढलेली वर्दळ

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने याचा परिणाम वडगाव शहरातील अंतर्गत रस्त्यावर ही होत आहे. किमान सुटीच्या दिवशी तरी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

विशाल वहिले, नगरसेवक

वडगाव ते तळेगावदरम्यान होणारी वाहतूककोंडी ही दररोजच बाब झाली आहे. त्यात वडगाव शहर किंवा परिसरात सर्व सुविधा असलेले एकही सुसज्ज असे रुग्णालय नाही. त्यामुळे या वाहतूक कोंडीमुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.

भाऊसाहेब ढोरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news