Drumsticks Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Vegetable Market Prices: पिंपरी भाजी मंडईत भाज्यांचे दर घसरले; ग्राहकांना दिलासा

शेवगा, गवार, कोबी-फ्लॉवर स्वस्त; मोशी उपबाजारातही आवक वाढली

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. 25) भाज्यांचे दर कमी झाले होते. शेवगा, गवार तसेच वांगी, कोबी, फ्लॉवरचे दर कमी झाले आहेत. वाटाणा गाजर यांचा हंगाम सुरु असल्याने यांचे दर 30 ते 40 रुपये आहेत. शेवग्याचे दर 200 वरून 120 रुपये प्रति किलोने विक्री केली जात आहे. शिमला 70 रुपये, गवार 120 रूपये, फ्लॉवर 40 रुपये किलो दर होता.

फळभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :

रविवारी बाजारात गवार 150 रुपये किलो, शेवगा 100, वाटाणा 30, टोमॅटो 30, भेंडी 60, फ्लॉवर 80, कोबी 60, मिरची 70, गाजर 40, शिमला 90, लसूण 180, आले 70, वांगी 80, काकडी 30, कारले 60, कांदे 20 - 25, बटाटा 25- 30, बिन्स 50, पावटा 70, लाल भोपळा 30, दोडका 50, तोंडली 80, बीट 40, तर दुधी 50 रुपये आणि घेवडा 50 रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.

पिंपरी बाजारातील दर पालेभाज्यांचे दर (रु.) प्रति जुडी

कोथिंबीर 15 रुपये, मेथी 15, पालक 15, शेपू 15, राजगिरा 20, पुदिना 10, मुळा 25, चवळई 15, लाल माठ 15, कांदापात 20, करडई 15, आळू पाने 15 रुपये, चुका 20 रुपये प्रति जुडी दराने विक्री केली जात आहे.

फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)

शेवगा 120 - 150 रुपये, गवार 140 रुपये, पावटा 80, तोंडली 100, वाटाणा 40 रुपये, बीट 40, दोडका 70, कारली 70, भरताची वांगी 60, भेंडी 70 - 80, मिरची 80, फ्लॉवर 40, कोबी 30, वांगी 40, घोसळे 70, पडवळ 80, दुधी भोपळा 70, पापडी 70, सुरण 80 रुपये, मद्रास काकडी 40, आरबी 50, सिमला 80 रुपये, राजमा 50, बिन्स 50 रुपये, गाजर 40, किलो, आवळा 60 - 70, रताळी 60 रुपये, टोमॅटो 30 रुपये, बिन्स 50 रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.

मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)

कांदा 10, बटाटा 10, आले 35, लसूण 100, भेंडी 40, गवार 100, टोमॅटो 15, वाटाणा 30, घेवडा 45, दोडका 45, हिरवी मिरची 60, दुधी भोपळा 30, काकडी 20, कारली 45, गाजर 20, फ्लॉवर 15, कोबी 10, वांगी 25, ढोबळी 40, तोंडली 35, बीट 25, शेवगा 100, घोसाळी 25, मका कणीस 15 रुपये प्रतिकिलो दर होते.

मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)

फळभाजी 4657, पालेभाजी 70900 (गड्डी), फळे आवक 803, कांदा 651, बटाटा 462, आले 59, लसूण 30, भेंडी 120, गवार 7, टोमॅटो 802, वाटाणा 395, घेवडा 76, दोडका 4, हिरवी मिरची 223, दुधी भोपळा 19, काकडी 110, कारली 20, डांगर 22, गाजर 272, फ्लॉवर 456, कोबी 306, वांगी 136, ढोबळी 71, बीट 44, शेवगा 22, लिंबू 115, मका कणीस 101, तोंडली 4, रताळी 5 क्विंटल इतकी आवक झाली आहे.

जळगावच्या बोरांना मागणी

पिंपरी फळ बाजारात खरबूज, कलिंगड आणि जळगावच्या बोरांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून ग््रााहकांची मागणी वाढत आहे. जळगावच्या आंबट गोड बोरांचा भाव प्रति किलो 200 रूपये आहे. खरबूज आणि कलिंगड 100 रूपये दीड किलोने विक्री केली जात आहे. तसेच अननसांची देखील मोठ्या प्रमाणात आवक झाली असून 140 रूपये दर होता. इतर फळांचे दर नेहमीसारखे स्थिर आहेत.

फळांचे दर प्रतिकिलो पुढीलप्रमाणे

केळी 50 - 60 रुपये डझन, संत्री 100 रुपये, चिकू 100, सफरचंद 200, तर मोसंबी 100, डाळींब 260, पेरू 100 रुपये दीड किलो, पपई 60, पिअर 200 - 240 रुपये, ड्रॅगनफुट 100 रुपये दीड किलो, किवी 100, नाश्पती 120 रुपये, आलुबुखार 150 रुपये, अननस 100 रुपये, अंजीर 100 रुपये तर स्ट्रॉबेरी 100 रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT