पिंपरी: भाज्यांची आवक कमी-जास्त प्रमाणात होत असल्याने दरात चढ उतार होत आहे. दरम्यान, या आठवडयात शेवगा, गवार, वांगी या भाज्याचे दर अजूनही वाढलेलेच आहेत. तर, बटाटा, लसूण, आले, ढोबळी, पालक या भाज्यांचे दर मागील आठवड्याच्या तुलनेत कमी झाले आहेत. गवार 180 वरून 160, तर शेवगा 400 वरून 250 रुपये प्रतिकिलोने विक्री केला जात आहे.
जळगाव वरून वांगी पिंपरी मंडईत विक्रीसाठी उपलब्ध झाले असून, 100 रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. दरम्यान, शेवगा आणि गवाराचे दर या आठवडयात काही प्रमाणात कमी झाले आहेत. रोजच्या वापरातील कांदा, बटाटा, लसूण, आले यांच्या दरात घसरण झाली आहे. पावटा, रताळी या भाज्यांचे दर स्थिर आहेत. तर, तोंडली दरात देखील काहीशी वाढ झाली आहे. हिवाळयाच्या तोंडावर हरभरा भाजीला मोठी मागणी असून 100 ते 120 रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. दरम्यान शेपू आणि मेथीच्या दरात काहीशी घसरण झाली आहे.
मोशीत फळभाज्यांच्या दरात वाढ
मोशी उपबाजार समितीमध्ये फळभाज्या, पालेभाज्यांची आवक वाढली आहे. 4 हजार 957 क्विंटल फळभाज्या तर, 65 हजार 300 गड्डयांची पालेभाज्यांंची आवक झाली आहे. त्यात शेवगा, चवळी, गवार, पडवळ या दरांत मोठी वाढ झाली आहे. कोथिंबीरची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे; मात्र कांदापात, मुळा याचे दर प्रतिजुडी 40 रुपयांच्या पुढे आहेत.
फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो) : कांदा : 30, बटाटा : 25 ते 30, लसूण : 80 ते 100, आले : 50 ते 60, भेंडी : 90 ते 100, गवार : 160 ते 180, टोमॅटो : 30 ते 40, मटार : 80, घेवडा : 80, राजमा : 80, दोडका : 100, मिरची : 50 ते 60, दुधी भोपळा : 60, काकडी : 40, कारली : 60 ते 80, डांगर : 30, गाजर : 40, पापडी : 80, पडवळ : 100, फ्लॉवर : 80 ते 100, कोबी : 40 ते 50, वांगी : 80, ढोबळी : 50 ते 60, बीट : 40, पावटा : 80, वाल : 60, रताळी : 80, शेवगा : 250 ते 300, चवळी : 60 ते 70, घोसाळी : 60, कडिपत्ता : 80 ते 100, लिंबू : 30 ते 40, मका कणीस : 40 ते 50, सुरण : 80, परवर : 100, तोंडली : 100 ते 110 रुपयांना विक्री केली जात आहे.
असे आहेत पालेभाज्यांचे दर (प्रति गड्डी) :
कोथिंबीर : 20, मेथी : 25 ते 30, शेपू : 20, कांदापात : 30 ते 40, पालक : 20, पुदिना : 10, हरभरा 30 ते 40 असे पालेभाज्यांचे प्रति जुडी दर आहेत.
फळांचे भाव (प्रति किलो)
सफरचंद : 100 ते 300, मोसंबी : 70 ते 100, संत्रा : 120 ते 160, डाळिंब : 200 ते 220, पेरू : 60 ते 100, पपई : 50 ते 60, चिक्कू : 100 ते 120, केव्ही : 100, सीताफळ : 70, अननस : 100 ते 120, स्टोबेरी : 300, बोरं : 70, आवळा : 100, पेर : 200 ते 240, खरबूज : 60, कलिंगड : 40 ते 50, अंजिर : 200 रुपये प्रती किलो दराने विक्री केली जात आहे.