Drowning death Incident  Pudhari
पिंपरी चिंचवड

Indrayani River Drowning: कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

मित्रांसोबत फिरायला गेलेल्या प्रथमेश लोणारीचा दुर्दैवी अंत; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: तळेगाव दाभाडेजवळील कुंडमळा येथे मित्रांसमवेत फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा इंद्रायणी नदीत पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार (दि. 17) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

प्रथमेश लोणारी (24, रा. मांजरी खुर्द) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी याबाबत माहिती दिली.

प्रथमेश हा चार ते पाच मित्रांसमवेत कुंडमळा येथे फिरण्यासाठी आला होता. सायंकाळी सर्वजण इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याची खोली व प्रवाहाचा अंदाज न आल्याने प्रथमेश पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी तत्काळ आरडाओरडा करत मदतीसाठी धाव घेतली.

सागर भेगडे यांनी तातडीने ‌‘वन्यजीव रक्षक मावळ‌’ संस्था व ‌‘शिवदुर्ग मित्र, लोणावळा‌’ या बचाव पथकांना माहिती दिली. काही वेळातच रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल होऊन शोधमोहीम सुरू केली. अवघ्या पाच ते दहा मिनिटांत प्रथमेशला पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

त्याला तातडीने तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या शोधमोहिमेत वन्यजीव रक्षक व शिवदुर्ग संस्थेचे निलेश गराडे, भास्कर माळी, रवी कोळी, विराज गराडे, विनय सावंत, शाहरुख सय्यद, राजू सय्यद, सागर भेगडे, कुंदन भोसले आदींनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT