Pimpri Chinchwad Property Tax: पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ताकरात बदल; ‘अ-ब’ वर्गवारीमुळे उत्पन्नात वाढ

कर वसुलीत सुसूत्रता; महापालिकेच्या उत्पन्नात 50 कोटींची वाढ अपेक्षित
Property Tax
Property TaxPudhari
Published on
Updated on

पिंपरी: शहरात निवासी व बिगरनिवासी मालमत्ताचे तीनऐवजी केवळ अ आणि ब असे दोनच विभाग असणार आहेत. या दोन विभागात संपूर्ण शहरातील भाग विभागला जाणार आहे. त्यामुळे मालमत्ताकर वसुलीत सुसूत्रता येणार असून, महापालिकेच्या उत्पन्नात दरवर्षी सुमारे 50 कोटी रुपयांची वाढ होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

Property Tax
Maharashtra MIDC Land Acquisition: मावळमध्ये एमआयडीसीला ग्रामस्थांचा विरोध; जमीन संपादनावर ठाम भूमिका

पालिकेकडे 7 लाख 84 हजार 420 मालमत्तांची नोंद

शहरात निवासी, औद्योगिक, मोकळ्या जमीन अशा 7 लाख 84 हजार 420 मालमत्तांची महापालिकेकडे नोंद आहे. विविध गावे मिळून पिंपरी-चिंचवड शहराची निर्मिती झाली आहे. नागरिकांना मूलभूत व पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी सन 1982 मध्ये महापालिका अस्तित्वात आली. त्यानंतर साधारण तीन टप्प्यांत लगतच्या गावांचा समावेश झाला. तसेच, झोपडपट्ट्या, चाळी, बैठी घरे, जुन्या इमारती, हाऊसिंग सोसायट्या, समाविष्ट गावे, त्यांचा विकास झाल्यानंतरची बांधकामे वाढली.

त्या सर्व मालमत्तांना पालिकेच्या वतीने मालमत्ताकराची आकारणी केली जाते. ही कर आकारणी गेल्या अनेक वर्षांपासूनच केली जात असताना यासाठी शहरात भागांची अ, ब आणि क अशी वर्गवारी आहे. मात्र, सध्यस्थितीत शहरातील ब आणि क या वर्गातील भागामध्ये झपाट्याने विकास झाला आहे. त्यामुळे या भागातील मालमत्तांना कमी दराने मालमत्ताकर आकारणी होत होती. याचा विचार करून महापालिकेने आता वर्गवारीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव सोमवारी (दि. 20) होणाऱ्या महापालिका सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

Property Tax
Reckless Driving Black Film Vehicles: नवलाख उंबरेत बेफाम वाहनचालकांचा धुमाकूळ

सद्यस्थितीत विभागनिहाय गावे

अ विभाग : निगडी प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड, सांगवी, पिंपरी वाघेरे, पिंपरी कॅम्प, महापालिका भवन, फुगेवाडी, दापोडी, भोसरी या करसंकलन विभागीय कार्यालयातील सर्व समाविष्ट आणि 1997 मध्ये समाविष्ट थेरगावचा भाग. ब विभाग : थेरगाव कार्यालयांतर्गत भूजबळवस्ती, वाकडकरवस्ती, भूमकरवस्ती; दिघी बोपखेल कार्यालयांतर्गत साईपार्क, आदर्शनगर, दिघी गावठाण परिसर. क विभाग : चऱ्होली, मोशी, चिखली, तळवडे, किवळे विभागातील सर्व भाग, थेरगावअंतर्गत पुनावळे गावठाण, जीवननगर, निंबाळकरनगर, ताथवडे गावठाण; फुगेवाडी दापोडी कार्यालयांतर्गत बोपखेल आणि शहरातील सर्व झोपडपट्ट्या.

Property Tax
Pimpri Chinchwad Illegal Construction: पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट

निवासी, बिगरनिवासी मालमत्तांना असा असणार मालमत्ताकर

शहरातील मालमत्तांची आता अ आणि ब अशी वर्गवारी करण्यात येणार आहे. निवासी मालमत्तांना अ वर्गात 322 रुपये, ब वर्गात 306 रुपये प्रती चौरस मीटर असा मालमत्ताकर असणार आहे. बिगरनिवासी मालमत्तांना अ वर्गात 967 रुपये आणि ब वर्गात 919 रुपये प्रतिचौरस मीटरप्रमाणे मालमत्ताकराची आकारणी केली जाणार आहे. या कर संकलन विभागाच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर 1 एप्रिल 2026 नंतर नोंदणी झालेल्या आणि यापुढे नोंदणी होणार्या नवीन बांधकामासाठी हे दर लागू केले जाणार आहेत.

Property Tax
Hemophilia Awareness India: हिमोफिलिया रुग्णांसाठी इंजेक्शनचा तुटवडा; उपचार महाग

प्रस्तावित विभागनिहाय गावे

अ विभाग : निगडी प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड, थेरगाव, सांगवी, पिंपरी वाघेरे, पिंपरी कॅम्प, महापालिका भवन, फुगेवाडी दापोडी, भोसरी, चर्होली, मोशी, चिखली, वाकड कस्पटेवस्ती आणि किवळे कार्यालयांतर्गत रावेत. ब विभाग : तळवडे व दिघी बोपखेल कार्यालयांतर्गत समाविष्ट सर्व भाग, किवळे कार्यालयांतर्गत किवळे, मामुर्डी, विकासनगर आणि शहरातील सर्व झोपडपट्ट्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news