Modak Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Ganeshotsav Modak: बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीच्या मोदकांसह ‘फ्लेवर’चीही मेजवानी; पिंपरीत मोदकांना जोरदार मागणी!

काजू, गाजर, गुलकंद ते चॉकलेट-पान मोदक बाजारात; नारळ, साखर, दूध महागल्याने नैवेद्याचा खर्च वाढला

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: बाप्पाच्या आगमनाआधी दररोज काय नैरायचा याचे घरोघरी नियोजन केले जाते. नैवेद्याची विशेष तयारी करण्यासाठी भाविक सज्ज झाले आहेत. दहा दिवस विविध प्रकारच्या पक्वानांचा नैवेद्य असतो. भाविकांची गरज पाहता विविध फ्लेवरचे मोदक बाजारात दाखल झाले आहेत. उकडीच्या मोदकांसह फ्लेवरचे मोदक पसंतीस उतरत आहेत.

गणेशोत्सव आणि उकडीचे मोदक हे समीकरणच आहे. बाप्पाला खास उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातोच. याचबरोबर दररोज दहा दिवस गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. नैवेद्यासाठी सर्व प्रकारची मिठाई असतेच.

काजू कतली, विविध प्रकारच्या बर्फी, फ्लेवर्सचे मोदक यांना मागणी असते. या वेळी नारळ, सुका खोबरे महाग झाल्याने नैवेद्याकरिता खिशाला कात्री लावावी लागेल. मागील वर्षीच्या तुलनेत नारळ, साखर, दूध सगळेच जिन्नस महाग झाल्याने मोदकांची किंमतही वाढली आहे.

नैवेद्य असलेल्या पंचखाद्यात खोबरे, खारीक, खडीसाखर, खसखस वापरले जाते. यात सुक्या खोबर्‍याचा अधिक वापर केला जातो. खोबर्‍याच्या दरात झालेली वाढ पाहता यंदा बाप्पाची खिरापत महाग झाली आहे.

मोदक दर

उकडीचा मोदक : 40 ते 50 रुपये नग, फ्लेवर मोदक - 650 रुपये किलो यामध्ये काजू मोदक, गाजर मोदक, गुलकंद मोदक, चीज - स्वीट- कॉर्न मोदक, चॉकलेट मोदक, पनीर मोदक, बुंदी मोदक, तळलेले मोदक, उकडीचे मोदक, रवा मोदक, सुक्या मेव्याचे मोदक, डार्क चॉकलेट मोदक, ओल्या नारळाचे मोदक, पंचखाद्य मोदक, गुलाबजाम मोदक, पान मोदक अशा प्रकारचे मोदक नैवेद्यासाठी उपलब्ध आहेत. कंदी पेढा - 480 रुपये किलो.

गौरीच्या आरासासाठी फराळही

बेसन लाडू 500 रुपये, रवा लाडू 480 रुपये, मोतीचूर लाडू 450 रुपये, ड्रायफ्रुटस लाडू 950 रुपये, चकली 650 रुपये, शंकरपाळी 480 रुपये, चिवडा 480 रुपये, करंजी 480 रुपये, चिरोटे 550 रुपये, अनारसे 700 रुपये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT