PCMC ID Card Compulsory: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना ओळखपत्र सक्ती! आयुक्तांचा पुन्हा आदेश

कार्यालयीन वेळेत दर्शनी भागावर ओळखपत्र लावणे बंधनकारक; नियम न पाळल्यास शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी ओळखपत्र गळ्यात घालावे, असा आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पुन्हा काढला आहे. अधिकारी व कर्मचारी ओळखू यावेत म्हणून हा आदेश काढण्यात आला आहे. ओळखपत्र नसल्यास कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Ganeshotsav Mahaprasad FDA Rules: गणेशोत्सवातील महाप्रसादासाठी नवा नियम! केटरर्सना एफडीएची पूर्वपरवानगी आवश्यक

महापालिकेचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी महापालिकेचे अधिकृत ओळखपत्र घालावे, असा आदेश आहे. तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी त्या संदर्भातील आदेश दिले होते. त्याच्या काळात त्यांची प्रभावी अंमलबजावणी झाली.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Footpaths: पिंपरी-चिंचवडमध्ये पादचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर! २१६० किमी रस्त्यांपैकी केवळ ३६८ किमीवर पदपथ

मात्र, त्यांच्या बदलीनंतर अधिकारी व कर्मचारी निश्चित केलेला गणवेश तसेच, ओळखपत्र लावण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे. कार्यालयीन वेळेत अनेक कर्मचारी कॅण्टीनमध्ये बसून गप्पा मारत असल्याचे चित्र नेहमी दिसते. तसेच, साईट व्हिजीटचे कारण देऊन खासगी कामे करणे, खासगी कार्यक्रमात सहभागी होणे असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Ganeshotsav Travel: गणेशोत्सवात गावी जाणे महागले! खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची आर्थिक लूट

अधिकारी व कर्मचार्‍यांची ओळख पटावी म्हणून सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी ओळखपत्र घालावे, असे आदेश आयुक्त सूर्यवंशी यांनी काढले आहेत. ओळखपत्र कार्यालयीन वेळेत परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ओळखपत्र परिधान करण्यासाठी वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Lonavala DJ Free Ganeshotsav: लोणावळ्यात गणेशोत्सवात डीजेला लगाम; मोठ्या आवाजात साउंड वाजवल्यास कारवाईचा इशारा

त्यानुसार महापालिकेच्या सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना अधिकृत ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे. विभागप्रमुखांनी आपल्या विभागाचील अधिकारी व कर्मचार्‍यांनी ओळखपत्र लावले किंवा नाही याची खात्री करावी. ओळखपत्र नसलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news