Voter ID Proofs Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Voting ID Proof: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक: मतदानासाठी ओळखपत्र अनिवार्य

मतदार ओळखपत्र नसल्यास 12 पर्यायी पुराव्यांपैकी एक दाखवणे आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मतदारांना मतदान केंद्रावर मतदानासाठी गेल्यानंतर मतदार छायाचित्र ओळखपत्र दाखवल्यानंतर मतदान करता येईल. मतदार ओळखपत्र नसल्यास त्या व्यक्तीला राज्य निवडणूक आयोगाच्या अन्य 12 प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे. ओळखपत्र नसल्यास मतदान करता येणार नाही.

निवडणुकीसाठी 15 जानेवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 ला मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र मतदाराने छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटविण्यासाठी सादर करावे. छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र नसेल, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 पैकी कोणताही एक पुरावा सादर करावा लागेल, अशी माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

हे बारा पुरावे ग््रााह्य धरणार

  • भारताचा पासपोर्ट

  • आधारकार्ड

  • वाहन चालविण्याचा परवाना

  • पॅन कार्ड

  • केंद्र /राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचाऱ्यांची छायाचित्रासह ओळखपत्रे

  • राष्ट्रीयीकृत बँका किंवा पोस्ट ऑफिसमधील खातेदाराचे छायाचित्र असलेले पासबुक

  • सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला छायाचित्रासह अपंगत्वाचा दाखला

  • राष्ट्रीय ग््राामीण रोजगार हमी योजनेखालील छायाचित्र असलेले ओळखपत्र (मनरेगा जॉब कार्ड)

  • निवृत्त कर्मचाऱ्यांची किंवा त्यांच्या विधवा/अवलंबित व्यक्तींची छायाचित्र असलेली निवृत्तीवेतन विषयक कागदपत्रे (उदा. पासबुक, प्रमाणपत्र)

  • लोकसभा किंवा राज्यसभा सचिवालय तसेच, विधानसभा किंवा विधानपरिषद सचिवालय यांनी सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र

  • स्वातंत्र्यसैनिकाचे छायाचित्र असलेले ओळखपत्र

  • केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे छायाचित्रासह कार्ड

मतदानप्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी ओळखपत्र दाखवावे

लोकशाही प्रक्रियेत मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. मतदान करताना प्रत्येक मतदाराने स्वतःची ओळख निश्चित करण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करावे. ज्यांच्याकडे सदर ओळखपत्र नसेल त्यांनी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा मतदान केंद्रावर सादर करावा. यामुळे मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरळीत पार पडण्यास मदत होईल, असे आयुक्त निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

पुरावा नसेल, तर मतदान करता येणार नाही

मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी मतदारांनी आवश्यक ओळखपत्रे सोबत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. राज्य आयोगाने निश्चित केलेल्या 12 पैकी कोणताही एक वैध ओळखीचा पुरावा मतदान केंद्रावर सादर करावा अन्यथा मतदान करता येणार नाही, असे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT