पिंपरी: पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. महापालिकेतील 128 जागांपैकी भाजपने तब्बल 84 जागांवर आघाडी घेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार दणका दिला आहे. तर शिंदेसेना 7 जागांवर आघाडीवर आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका मतमोजणी : दुपारी अडीचपर्यंतची आकडेवारी
एकूण जागा - 128
भाजप - 84
शिवसेना - 7
राष्ट्रवादी - 35
काँग्रेस - 00
शिवसेना (उद्धव ठाकरे) - 00
राष्ट्रवादी (शरद पवार) - 01
महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 00
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा) - 01
दुपारी अडीचपर्यंत काय काय घडले?
> शहरातील आठ ठिकाणी सकाळी दहापासून प्रत्यक्ष मोजणीस सुरुवात झाली. दुपारी दोनच्या सुमारास प्रभाग क्रमांक 21, 23, 24, 27 या चार प्रभागांमधील मतमोजणी तांत्रिक कारणांमुळे थांबवण्यात आली. प्रभाग क्रमांक 17 मध्ये पल्लवी वाल्हेकर झाल्या आहेत.
> दहाव्या फेरी अखेर प्रभाग क्रमांक 25 मधील स्थिती काय?
प्रभाग क्रमांक 25 कुणाल वैजनाथ वाव्हळकर – 7676 मते घेत 4 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
25 ब
रेश्मा चेतन भुजबळ – 11772 मते घेत 6000 मतांनी आघाडीवर,
25 क
श्रुती राम वाकडकर – 8238
चित्रा संदीप पवार – 7434
25 ड
राहुल तानाजी कलाटे – 10861
चेतन महादेव पवार – 4190
> प्रभाग 32 सांगवीमध्ये माजी महापौर उषा ढोरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे पिछाडीवर आहेत.
> प्रभाग 20 येथे योगेश बहल यांची मोठी आघाडी घेतली असून मनीषा शाम लांडे, सुलक्षणा धर, सुजाता पालांडे हे देखील आघाडीवर आहेत.
> प्रभाग क्रमांक 10, 14, 15, 19 सर्वच प्रभागात भाजपची आघाडी.
प्रभाग क्रमांक 25 - फेरी क्रमांक 12
अ –
कुणाल वैजनाथ वाव्हळकर – 10056
विक्रम भास्कर वाघमारे – 4190
शंभू अशोक ओव्हाळ – 3094
ब
रेशमा चेतन भुजबळ – 14394
रेखा राजेश दर्शले – 5445
अंकिता तुषार भुमकर - 4964
क
श्रुती राम वाकडकर - 12068
चित्र संदीप पवार - 8477
अर्पिता अजित पवार - 3066
ड
राहुल तानाजी कलाटे - 14718
चेतन महादेव पवार - 4847
मयूर पांडुरंग कलाटे – 5177
प्रभाग क्रमांक 26
अ
ॲड. विनायक गायकवाड – 14243
संकेत शामराव जगताप - 4132
ब -
आरती सुरेश चौंधे - 11350
सारिका गणेश कस्पटे - 6708
क
स्नेहा रणजीत कलाटे - 14759
सीमा शिरीष साठे - 3085
ड
संदीप अरुण कस्पटे - 13719
तुषार गजानन कामटे - 3320
प्रभाग क्रमांक 28
अ
बापू उर्फ शत्रुघ्न सिताराम काटे - 9445
उमेश गणेश काटे - 5702
ब
अनिता संदीप काटे - 7966
शितल नाना काटे - 7386
क
कुंदा संजय भिसे - 9382
मीनाक्षी अनिल काटे - 5519
ड
विठ्ठल उर्फ नाना काटे - 9528
संदेश रामचंद्र काटे - 5830
भाग क्रमांक 29
अ
रवीना सागर आंगोळकर - 8479
कुंदा गौतम डोळस - 5680
ब
शकुंतला भाऊसाहेब धराडे - 8395
सुनिता दिशांत कोळप - 6167
क
वैशाली राहुल जवळकर - 6001
शशिकांत गणपत कदम - 5767
राजू रामा लोखंडे - 3648
ड
तानाजी दत्तात्रय जवळकर - 7594
शाम शांताराम जगताप - 7594
पिंपरी- चिंचवडमध्ये पाच आमदारांची प्रतिष्ठापणाला
महापालिकेत क्षेत्रात पिंपरी, चिंचवड, भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ असून चिंचवड, भोसरीत भाजपचे आमदार आहेत. तर पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. तर भाजपकडून विधान परिषदेवर दोन आमदार आहेत. भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमधील शाब्दिक युद्ध राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता. महेश लांडगेंनी अजित पवारांचा एकेरी उल्लेख केला होता. तर अजित पवारांनी तीन- तीन सभा घेत लांडगेंवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे पिंपरी- चिंचवडची निवडणूक ही भाजप- अजित पवार दोघांसाठी महत्त्वाची होती.
पिंपरी चिंचवडमधील पक्षनिहाय उमेदवारांची आकडेवारी
भाजपा-120
आरपीआय-5
राष्ट्रवादी काँग्रेस -121
राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष-13
शिवसेना (एकनाथ शिंदे)-57
काँग्रेस -55
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष-48
महाराष्ट्र नवनिर्माण सेना-12
वंचित बहुजन आघाडी-34
आम आदमी पार्टी-18
कुठे होतेय मतमोजणी?
हेडगेवार भवनात मोजणीसाठी 18 फेऱ्या
प्रभाग क्रमांक 10, 14, 15 आणि 19 येथील मतमोजणी प्राधिकरण, निगडी येथील हेडगेवार भवन येथे होत आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 10 साठी मतमोजणीच्या 17 फेऱ्या, प्रभाग क्रमांक 14 व 19 साठी प्रत्येकी 18 फेऱ्या आणि प्रभाग क्रमांक 15 साठी मतमोजणीच्या 15 फेऱ्या होणार आहेत.
ऑटो क्लस्टर केंद्रात मोजणीचे 14 व 16 फेऱ्या
प्रभाग क्रमांक 16, 17, 18 आणि 22 येथील मतमोजणी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे होत आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 16 व 22 साठी मतमोजणीच्या प्रत्येकी 14 फेऱ्या होणार आहेत. प्रभाग क्रमांक 17 व 18 साठी प्रत्येकी 16 फेऱ्या होणार आहेत.
संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल केंद्रात मोजणीच्या 17 ते 21 फेऱ्या
प्रभाग क्रमांक 2, 6, 8 आणि 9 येथील मतमोजणी इंद्रायणीगर, भोसरी येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल येथे होत आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 2 साठी मतमोजणीच्या 21 फेऱ्या, प्रभाग क्रमांक 6 साठी मतमोजणीच्या 17, प्रभाग क्रमांक 8 साठी 20 फेऱ्या आणि प्रभाग क्रमांक 9 साठी मतमोजणीच्या 18 फेऱ्या होणार आहेत.
ड क्षेत्रीय कार्यालय केंद्रात मोजणीसाठी 20 व 21 फेऱ्या
प्रभाग क्रमांक 25, 26, 28 आणि 29 येथील मतमोजणी रहाटणी येथील ड क्षेत्रीय कार्यालय येथे होत आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 25 व 29 साठी मतमोजणीच्या प्रत्येकी 20 फेऱ्या, प्रभाग क्रमांक 26 व 28 साठी प्रत्येकी 21 फेऱ्या होणार आहेत.
कबड्डी संकुल केंद्रात मोजणीच्या 16 व 18 फेऱ्या
प्रभाग क्रमांक 3, 4, 5 आणि 7 येथील मतमोजणी भोसरीती अंकुशराव लांडगे नाट्यगृहामाील कबड्डी प्रशिक्षण संकुल येथे होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 3 साठी मतमोजणीच्या 18 फेऱ्या होणार आहेत. प्रभाग क्रमांक 4, 5 व 7 साठी प्रत्येकी 16 फेऱ्या होणार आहेत.
घरकुल टाऊन हॉल केंद्रात मोजणीकरिता 14 ते 17 फेऱ्या
प्रभाग क्रमांक 1, 11, 12 आणि 13 येथील मतमोजणी चिखलीतील घरकुलामागील टाऊन हॉल येथे होत आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 1 साठी मतमोजणीच्या 17 फेऱ्या होणार आहेत. प्रभाग क्रमांक 11 साठी मतमोजणीच्या 16 फेऱ्या आहेत. प्रभाग क्रमांक 12 साठी मतमोजणीच्या 14 फेऱ्या आणि प्रभाग क्रमांक 13 साठी मतमोजणीच्या 15 फेऱ्या होणार आहेत.
थेरगाव कामगार भवनात मोजणीच्या 10 ते 17 फेऱ्या
प्रभाग क्रमांक 21, 23, 24 आणि 27 येथील मतमोजणी थेरगाव येथील शंकर गावडे स्मृती कामगार भवन येथे होत आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 21 साठी मतमोजणीच्या 17 फेऱ्या, प्रभाग क्रमांक 23 साठी मतमोजणीच्या 10 फेऱ्या, प्रभाग क्रमांक 24 साठी 14 फेऱ्या आणि प्रभाग क्रमांक 27 साठी मतमोजणीच्या 16 फेऱ्या होणार आहेत.
कासारवाडी केंद्रात मोजणीसाठी 16 ते 20 फेऱ्या
प्रभाग क्रमांक 20, 30, 31 आणि 32 येथील मतमोजणी कासारवाडीतील भाजी मंडई येथे होत आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 20 साठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या, प्रभाग क्रमांक 30 साठी मतमोजणीच्या 16 फेऱ्या, प्रभाग क्रमांक 31 साठी 19 फेऱ्या आणि प्रभाग क्रमांक 32 साठी मतमोजणीच्या 17 फेऱ्या होणार आहेत.