पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी अपक्ष तसेच, स्वतंत्रपणे लढणार्या उमेदवारांना चिन्हाचे वाटप झाल्यानंतर सर्व 32 प्रभागातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) असा थेट सामना रंगणार आहे. तसेच, काही प्रभागात शिवसेना (एकनाथ शिंदे), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे, काँग्रेस व अपक्ष उमेदवारही तगडी लढत देऊ शकतात. सध्या शहरभर प्रचाराचा धडाका सुरू असल्याने निवडणुकीत बाजी कोण मारणार, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
शहरात दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढती होणार आहेत. दुरंगी लढतीत बहुसंख्य प्रभागांत मुख्यतः भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना आहे. तिरंगी लढतीत तीन पक्षांच्या उमेदवारांमधील सामना दिसणार आहे. त्या प्रभागात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना (एकनाथ शिंदे) असे चित्र असेल. चौरंगी लढतीमध्ये भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना (एकनाथ शिंदे), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांसह अपक्षही रिंगणात आहेत. काही प्रभागांत बहुरंगी लढत होईल, असा राजकीय अंदाज बांधला जात आहे.
दुरंगी, तिरंगी, चौरंगी सामन्यामुळे शहरातील निवडणुकीची उत्सुकता ताणली गेली आहे. पुढील 10 दिवसांत प्रचाराचा धुराळा, मतदारांचा प्रतिसाद आणि अपक्ष उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद, यावर निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
या प्रभागात असू शकते दुरंगी लढतीचे चित्र
1ब, 1क, 2अ, 2ब, 2ड, 3ब, 3क, 3ड, 4ब, 4क, 5अ, 5ब, 6क, 6ड, 7अ, 7ब, 7क, 7ड, 8ब, 10क, 12ब, 15ब, 15क, 18अ, 19क, 21ब, 21ड, 24अ, 24ब, 24क, 24ड, 26अ, 26ब, 26क, 26ड, 27ब, 27ड, 28अ, 28ब, 28ड, 29अ, 29ब, 29क, 29ड.
या प्रभागात तिरंगी लढती
1ड, 2क, 4ड, 5क, 11ड, 12क, 12ड, 14क, 14ड, 16ब, 16क, 18ड, 19अ, 21अ, 21क, 22अ, 23ब, 23क, 25ब, 25ड, 27अ, 28क, 30ब, 31अ, 31ब, 31क, 31ड, 32अ, 32क.
या प्रभागात चौरंगी सामना
1अ, 3अ, 4अ, 5ड, 6अ, 9ड, 10अ, 11क, 13ब, 13क, 14अ, 14ब, 15अ, 15ड, 16अ, 16ड, 32ब, 32ड, 17अ, 18ब, 18क, 19ब, 19ड, 20ब, 20क, 20ड, 22क, 22ड, 23ड, 25अ, 25क, 27क, 30अ, 30क, 30ड.
या प्रभागात बहुरंगी लढत
8अ, 8क, 8ड, 9अ, 9ब, 9क, 10ड, 11अ, 11ब, 12अ, 13अ, 13ड, 17ब, 17क, 17ड, 20अ, 22ब, 23अ.