PCMC election counting preparation: महापालिकेकडून मतमोजणीची जोरदार तयारी

16 जानेवारीला निकाल; मतमोजणी कक्ष, स्ट्रॉंगरूम व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा
PCMC election counting preparation
PCMC election counting preparationPudhari
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. महापालिकेच्या निवडणूक यंत्रणेकडून मतमोजणी कक्षाच्या तयारी सुरू करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेला प्रशिक्षण कक्ष, मतमोजणी कक्षांची मांडणी, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष तसेच, संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे.

PCMC election counting preparation
FDA raid Maval: मावळात 31 कोटींचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त

त्या तयारीचा आढावा मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन कुमार सुधांशू, निवडणूक निरीक्षक सरिता नरके घेतला. त्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्या.

या वेळी आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर, निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, मुख्य अभियंता तथा मुख्य निवडणूक निरीक्षक यांचे समन्वय अधिकारी संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता तथा समन्वय अधिकारी हरविंदरसिंह बन्सल, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल शिंदे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन नगरे व कर्मचारी उपस्थित होते.

PCMC election counting preparation
Ajit Pawar warning to corporators: चुकीच्या गोष्टींना थारा देऊ नका! : उपमुख्यमंत्री अजित पवारांची नवनिर्वाचित नगरसेवकांना ताकीद

निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध तयारीबाबत माहिती दिली.

PCMC election counting preparation
Government Employee Code: उमेदवार-प्रचाराचे स्टेटस ठेवल्यास जाऊ शकते सरकारी नोकरी

स्ट्रॉंग रूमची रचना, तेथे ठेवण्यात आलेली ईव्हीएम यंत्रे, परिसरातील सुरक्षा व्यवस्था, पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही निरीक्षण व्यवस्था यांचा आढावा निरंजन कुमार सुधांशू यांनी घेतला. मतमोजणीच्या दिवशी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेचा आराखडा, मतमोजणी टेबलांची संख्या, अधिकारी व कर्मचारी नेमणूक, प्रवेश व निर्गमन मार्ग, माध्यम प्रतिनिधी व उमेदवार प्रतिनिधींसाठी करण्यात आलेली व्यवस्था याबाबतची माहिती देण्यात आली.

मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन कुमार सुधांशू, निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांनी मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news