Mobile Theft Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Mobile Theft: पिंपरी-चिंचवडमध्ये मोबाईल चोरीचा वाढता कहर; 12,596 प्रकरणे, केवळ 17% मोबाईल परत

सीईआयआर पोर्टलवर नोंद अत्यावश्यक; गर्दीच्या ठिकाणी सर्वाधिक चोरी, पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: शहरात मोबाईल चोरीच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली असून, मागील वर्षभरात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत तब्बल 12 हजार 596 मोबाईल चोरीला गेल्याची नोंद आहे. यापैकी केवळ 2 हजार 145 मोबाईल मूळ मालकांना परत मिळाले आहेत. केंद्र शासनाच्या सीईआयआर (उशपीींरश्र एर्ीिंळािशपीं खवशपींळूीं ठशसळीींशी) पोर्टलवरील अधिकृत आकडेवारीतून हे वास्तव समोर आले असून, नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

गर्दीच्या ठिकाणी चोरीच्या घटना

बाजारपेठा, बसस्थानके, रेल्वे परिसर, सण-उत्सव, राजकीय कार्यक्रम तसेच आयटी कंपन्यांच्या परिसरात मोबाईल चोरीच्या घटना अधिक प्रमाणात घडत आहेत. मोबाईलचा वाढता वापर, महागडे स्मार्टफोन आणि त्यातील आर्थिक व्यवहारांसाठीच्या ॲप्समुळे या चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.

सीईआयआर पोर्टल कसे कार्य करते?

सीईआयआर हे दूरसंचार विभाग (ऊेढ) संचलित राष्ट्रीय पोर्टल आहे. मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास संबंधित व्यक्तीने प्रथम पोलिसांत तक्रार नोंदवावी. त्यानंतर सीईआयआरच्या संकेतस्थळावर जाऊन मोबाईलचा खचएख क्रमांक नोंदवून ब्लॉकसाठी अर्ज करावा. ब्लॉक झालेला मोबाईल कोणत्याही नेटवर्कवर सक्रिय झाला, तर त्याची माहिती पोलिस यंत्रणेला मिळते आणि मोबाईल हस्तगत करून मालकाला परत देण्याची प्रक्रिया सुरू होते. मोबाईल सापडल्यानंतर त्याच पोर्टलवरून ‌‘अनब्लॉक‌’ करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. क्रमांक हा प्रत्येक मोबाईलचा स्वतंत्र ओळख क्रमांक असतो.

तत्काळ तक्रार, नोंद करणे गरजेचे

मोबाईल चोरी झाल्यानंतर तत्काळ पोलिसांत तक्रार आणि ‌‘सीईआयआर‌’ (उशपीींरश्र एर्ीिंळािशपीं खवशपींळूीं ठशसळीींशी) पोर्टलवर नोंद करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. या पोर्टलवर आयएमईआय क्रमांक ब्लॉक केल्यास चोरीचा मोबाईल कोणत्याही नेटवर्कवर वापरता येत नाही. त्यामुळे सायबर फसवणूक, बँकिंग गैरव्यवहार आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर रोखता येतो. त्वरित नोंद केल्यास तपास यंत्रणेला मोबाईल ट्रॅक करणे सोपे होते आणि मोबाईल मिळण्याची शक्यता वाढते. विलंब झाल्यास डेटा गैरवापराचा धोका वाढतो. त्यामुळे ‌‘सीईआयआर‌’वर त्वरित नोंद करणे गरजेचे आहे.

मोबाईल परत मिळण्याचे प्रमाण 17 टक्केच

सीईआयआर नोंदीनुसार मागील वर्षभरात शहरातून एकूण 12,596 तक्रारींपैकी 12,363 मोबाईलची नोंद सीईआयआरवर करण्यात आली. त्यापैकी 5,706 मोबाईल ‌‘ट्रेस‌’ झाले. यातील 2,347 मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. मात्र प्रत्यक्ष मालकांकडे सुपूर्द झालेले मोबाईल केवळ 2,145 इतके आहेत. म्हणजेच एकूण चोरीच्या घटनांच्या तुलनेत परत मिळण्याचे प्रमाण सुमारे 17 टक्क्‌‍यांच्या आसपास आहे.

चोरीचे स्वरूप बदलतेय

मोबाईल चोरी केवळ किरकोळ गुन्हा राहिलेला नाही. चोरीचे मोबाईल ऑनलाइन विक्री, पार्ट्समध्ये विक्री किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे सिम सक्रिय करून वापरण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. काही प्रकरणांत अशा मोबाईलचा वापर सायबर गुन्ह्यांसाठी होण्याची शक्यता असते. त्यामुळे चोरीनंतर उशीर न करता ब्लॉक करणे गरजेचे आहे.

मोबाईल सुरक्षिततेसाठी काय करावे?

  • गर्दीच्या ठिकाणी मोबाईल सुरक्षित खिशात ठेवावा.

  • सार्वजनिक ठिकाणी वापरताना सतर्कता बाळगावी.

  • मजबूत स्क्रीन लॉक, फिंगरप्रिंट किंवा फेस आयडी वापरावा.

  • ‌’ऋळपव चू ऊर्शींळलश‌’ किंवा तत्सम सेवा सक्रिय ठेवावी.

  • अनोळखी व्यक्तीकडे मोबाईल देणे टाळावे.

  • चोरी झाल्यास त्वरित पोलिसांत तक्रार व सीईआयआरवर नोंद करावी.

  • मोबाईल चोरीच्या प्रत्येक प्रकरणाची तत्काळ नोंद करून संबंधित खचएख

क्रमांक सीईआयआर पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ट्रेसिंगसाठी विशेष पथके कार्यरत आहेत. नागरिकांनी विलंब न करता तक्रार नोंदवावी. त्वरित नोंद केल्यास मोबाईल परत मिळण्याची शक्यता वाढते.
सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT