Pimpri Illegal Hoardings Action Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Illegal Hoardings Action: पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत होर्डिंग्सवर धडक कारवाई; 120 किऑक्स जप्त, 1 लाख दंड वसूल

अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि किऑक्सवर महापालिकेची कारवाई; शहर विद्रुपीकरणावर नियंत्रणासाठी धडक मोहीम सुरू

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरात चौकाचौकांत अनधिकृत किऑक्स, होर्डिंग, फ्लेक्स, बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. झाडे, खांब, महावितरणचे विद्युत खांब, विनापरवाना कमानी उभारून जाहिरातबाजी केली जात आहे.

अशा प्रकारे शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. एका दिवसाच्या कारवाईत एकूण 1 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच, फौजदारी गुन्हेही दाखल केले आहेत.

वाढदिवस, स्वागत समारंभ, उद्घाटन आदी प्रकारच्या कार्यक्रम निमित्ताने परिसरातील चौकाचौकांत फ्लेक्स लावून विद्रुपीकरण करण्यात येत आहे. यावर नियंत्रण राखण्यासाठी तसेच, विद्रुपीकरण रोखण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स, किऑक्स यासारखे फलक लावू नयेत अशा सूचना केल्या जात आहेत.

120 किऑक्स जप्त

आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी (दि. 15) दोन जणांवर कारवाई करत एकूण एक लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. एकूण 56 झेंडे, 27 लाकडी बॅनर, 7 लोखंडी फ्रेम आणि 120 किऑक्स जप्त करण्यात आले आहेत.

ग क्षेत्रीय कार्यालयाचे परवाना निरीक्षक कालिदास शेळके यांच्या पथकाने महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान व महापालिका पोलिसांच्या सहकार्याने ती कारवाई केली, अशी माहिती महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त राजेश आगळे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT