Heatwave Alert Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Heatwave Precautions: पिंपरी-चिंचवडमध्ये उष्णतेचा कहर; उष्माघाताचा धोका वाढला

सकाळपासूनच उन्हाचा तडाखा; आरोग्यतज्ज्ञांकडून पाणी पिणे व काळजी घेण्याचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: मागील काही दिवसांपासून शहर परिसरात उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. तीव उष्णतेच्या झळांमुळे नागरिक हैराण झाले असून, उकाडा असह्य होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून झळा जाणवत आहेत. उन्हामुळे उष्माघातासह इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू नये म्हणून नागरिकांनी भरपूर पाणी पिणे, फळांचे सेवन करणे, घराबाहेर पडताना विशेष काळजी घेणे आवश्यक असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांकडून दिला जात आहे.

शहरात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाच्या पाऱ्यात सातत्याने वाढ होत असल्याने दिवसेंदिवस उन्हाचा चटका जाणवत आहे. पारा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. घरातील पंखे, कुलरची हवादेखील गरम जाणवत आहे. घराबाहेर सावलीमध्ये थांबले तरीही उष्म्यामुळे नकोसे होत आहे.

उन्हाच्या झळांमुळे जनजीवन अक्षरक्ष: होरपळून निघाले आहे. अशा वातावरणात घराबाहेर पडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हामध्ये खूप वेळ शारीरिक कष्टाचे कामे टाळणे, आतिव्यायाम करणे टाळावे. अन्यथा शरीरातील तापमान वाढल्यास महत्वाचे अवयव निकामी होऊ शकतात. पेशींमधील जीवन प्रकिया थांबू शकते. वेळेत उपचार न मिळाल्यास जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो.

उन्हाळ्यामध्ये प्रामुख्याने लहान मुले, वयोवृध्द पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजार असलेले मद्यपान करणारे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह, मूत्रपिंड, फुफ्फुसांच्या आजाराने गस्त असलेले रुग्ण, उन्हामध्ये जास्त वेळ शारीरिक कष्ट करणाऱ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी उन्हाळ्यांच्या दिवसात स्वःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

उष्माघाताची लक्षणे

शारीरिक थकवा, तीव डोकेदुखी, मळमळ, उलट्या होणे, अचानक घाम फुटणे, बेशुध्द पडणे, त्वचा गरम कोरडी होणे, जास्त प्रमाणात घाम फुटणे, चिडचिडेपणा निर्माण होणे

संरक्षणात्मक उपाय

उन्हाळ्याच्या दिवसात खादी आणि पांढऱ्या कपड्यांचा वापर करावा. घराबाहेर पडताना पाण्याची बॉटल आणि गॉगल वापरणे, प्रवासादरम्यान सतत पाणी पिणे, फळांचे सेवन करणे, तसेच या दिवसात आतिव्यायाम करणे टाळावे. तसेच वृध्द व सहव्याधी असलेल्यांनी उन्हात जाणे शक्यतो टाळावे.

उन्हाची तीवता जास्त प्रमाणात वाढल्याने अनेकांना उष्णघाताचा त्रास होतो. ज्या नागरिकांचे फिरण्याचे काम आहे. त्यांनी विशेष काळजी घ्यावी. उन्हाळयाच्या दिवसांत किमान तीन लीटर पाणी पिणे, स्त्रोत असलेल्या फळांचे सेवन करणे, जेणेकरून शरीर थंड राहील.
कोमल बोरसे, आहारतज्ज्ञ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT