EV  Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad EV Demand Subsidy Impact: पिंपरी-चिंचवडमध्ये ईव्हींची मागणी वाढली; सबसिडी बंदीची शक्यता चिंतेत भर

24 हजारांहून अधिक ईव्ही नोंदणी; चार्जिंग स्टेशनची गरज, खर्च वाढीची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: इंधनाच्या वाढत्या किमती, पुरवठ्यातील अनिश्चितता आणि पर्यावरणपूरक पर्यायांची वाढती गरज यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. शहरात गेल्या काही वर्षात 24 हजारांहून अधिक ईव्हींची नोंदणी झाली असून, विशेषतः दुचाकी ईव्हींचा यात मोठा वाटा आहे. मात्र केंद्र सरकारची सबसिडी बंद होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने नागरिकांमध्ये काहीसे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सबसिडी बंदमुळे वाढणार खर्च:

केंद्र सरकारच्या पीएम ई-ड्राईव्ह योजनेंतर्गत ईव्ही दुचाकी आणि तीनचाकींना मिळणारी सबसिडी मार्च 2026 पर्यंत लागू आहे. त्यानंतर ही सबसिडी बंद होण्याची शक्यता आहे. यामुळे ईव्ही दुचाकींच्या किमतीत किमान 5 हजार रूपयांनी वाढ होण्याची शक्यता; तसेच बॅटरी क्षमतेनुसार 20 ते 40 टकक्कयांपर्यंत वाहनांच्ूया किंमत वाढण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

ईव्हीकडे का वाढला कल

  • इंधन दरवाढीमुळे नागरिकांचा आर्थिक भार वाढला

  • ईव्ही वाहने अधिक किफायतशीर

  • चालविण्यास सोपी

  • दुचाकी ईव्हींचे वर्चस्व

  • एकूण ईव्ही विक्रीत दुचाकींचा सर्वाधिक वाटा.

  • नागरिकांसाठी सोयीस्कर आणि कमी खर्चिक पर्याय.

  • देखभाल खर्च कमी आणि वापर सोपा.

शहरात चार्जिंग स्टेशनची गरज

ईव्हींच्या वाढत्या वापरामुळे चार्जिंग सुविधांची गरजही वाढत आहे. यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे असून, महापालिकेने शहरात 22 ठिकाणी नवीन चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. निगडी, भोसरी, पिंपळे सौदागर, मेट्रो स्टेशन आदीसारख्या मुख्यपरिसरात सध्या चार्जिंग सुविधा सुविधा उपलब्ध झाल्यास ईव्ही वाहनांचा वापर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ईव्हींचा वापर वाढल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होते. शहराच्या दृष्टीने हा सकारात्मक बदल मानला जात आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ईव्हींचा वाढता वापर ही भविष्यातील वाहतुकीची दिशा दर्शवणारी बाब आहे. मात्र, सबसिडी बंदी आणि चार्जिंग सुविधांची मर्यादा ही मोठी आव्हाने आहेत. योग्य धोरण आणि पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास शहरात ईव्ही क्रांती आणखी वेगाने होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT