RTO Online Services: आरटीओ सेवा पूर्णपणे ऑनलाईन; ‘सारथी’ आणि ‘वाहन 4.0’मधून 105 सेवा उपलब्ध

ड्रायव्हिंग लायसन्सपासून वाहन नोंदणीपर्यंत सर्व सेवा घरबसल्या; पारदर्शकता आणि वेग वाढणार
Pimpri Chinchwad RTO
Pimpri Chinchwad RTOPudhari
Published on
Updated on

हेमांगी सूर्यवंशी

पिंपरी: आरटीओ कार्यालयातील कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी; तसेच नागरिकांची धावपळ थांबवण्यासाठी सारथी आणि वाहन 4.0 या डिजिटल प्रणालीद्वारे सुमारे 105 सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या आहेत. आरटीओ कार्यालय पूर्णपणे ऑनलाईन प्रणालीशी जोडले गेले आहे. त्यामुळे नागरिक व वाहनचालकांना आरटीओ कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

Pimpri Chinchwad RTO
PMRDA Affordable Housing: पीएमआरडीएकडून ‘सर्वांसाठी घरे’ मोहिमेला वेग; पीएमएवायअंतर्गत 3,317 घरांचे वाटप

सारथी व वाहन 4.0 या डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाहन नोंदणी, पत्ताबदल, नूतनीकरण, डुप्लिकेट आरसी, ड्रायव्हिंग लायसन्स, ई-चलान, वाहन मालकी हस्तांतरण इत्यादी 105 सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे काम वेळेत होणार असून, या सुविधांसाठी एजंटची गरज लागणार नाही. पूर्वी वाहनासंबंधित कागदोपत्री कामकाजासाठी नागरिकांचा तसेच वाहनचालकांचा आरटीओ कार्यालयात वेळ जात असे; परंतु नागरिकांना आता घरबसल्या विविध सुविधा उपलब्ध झाल्याने हे काम वेगवान सुरळीत होणार आहे.

Pimpri Chinchwad RTO
Pimpri Chinchwad Cyber Fraud MCOCA: पिंपरी-चिंचवडमध्ये 11 कोटींच्या सायबर फसवणुकीत 9 जणांवर मोक्का; पोलिसांची मोठी कारवाई

अनेक नागरिक एजंट व मध्यस्थामार्फत संबंधित कागदपत्रे मिळवित होते; मात्र आता तुम्ही थेट सरकारी पोर्टलवर अर्ज करू शकता. यामुळे अनावश्यक खर्च टाळता येणार आहे. तसेच सर्व प्रकिया पारदर्शक आणि ट्रॅक करण्यायोग्य झाल्या आहेत. यासाठी संकेतस्थळावर गेल्यानंतर आपण ज्या राज्यात राहतो. ते राज्य निवडावे. त्यानंतर आवश्यक सेवा निवडावी लागणार आहे. त्यानंतर त्या संबंधित माहिती भरून तुमची कागदपत्रे अपलोड करावी लागतात. अर्ज क्रमांक नोंदवला जातो. संबंधित कामाच्या कालावधीनुसार तुमचे काम वेळेत होऊ शकणार आहे; तसेच आपल्या अर्जातील कामाची सद्यस्थिती काय आहे, हेदेखील अर्जदार ट्रॅक करू शकणार आहे.

Pimpri Chinchwad RTO
Pimpri Chinchwad Water Wastage: पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याची नासाडी सुरूच; एक दिवसाआड पुरवठ्यातही असमानता

सारथीमार्फत मिळणाऱ्या सेवामध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती आणि अनुज्ञप्ती परवाना अर्ज, वर्ग जोडणी, ऑनलाईन टेस्ट अपॉइंटमेंट बुकिंग करणे, अनुज्ञप्ती परवाना नूतनीकरण, नवीन वाहन वर्ग जोडणे, दुबार अनुज्ञप्ती परवाना , पत्ता बदल, अर्ज स्थिती आदी सेवा ऑनलाईन उपलब्ध झाल्या आहेत. तसेच वाहन नोंदणी 4.0 द्वारे वाहन नोंदणी, मालकी हस्तांतरण, दुबार आरसी, एनओसी, ई-चलान, वाहन फिटनेस प्रमाणपत्र भरणे, पत्ता बदल, आदी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत.

Pimpri Chinchwad RTO
Pimpri Accepted Corporators Election Delay: पिंपरीत स्वीकृत नगरसेवक निवड पुन्हा लांबणीवर; भाजपमधील मतभेद ठरले अडथळा

सारथी आणि वाहन 4.0 या ऑनलाईन सुविधेमुळे नागरिकांना आता कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. देशभरातील आरटीओ कार्यालयाने पूणपणे ऑनलाईन जोडले गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना आता थेट सरकारी पोर्टलवर अर्ज करता येणार आहे. त्यामुळे सेवा आधिक पारदर्शक आणि जलद होणार आहे.

राहुल जाधव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news