Pimpri Chinchwad Cyber Fraud MCOCA: पिंपरी-चिंचवडमध्ये 11 कोटींच्या सायबर फसवणुकीत 9 जणांवर मोक्का; पोलिसांची मोठी कारवाई

बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक; आंतरराज्य टोळी उघड
MCOCA
MCOCAPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सायबर गुन्हेगारांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल 11 कोटी 13 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 9 सदस्यांवर मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम)अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांवर मोका सारखी पहिल्यांदा मोठी कारवाई करण्यात आली आहे.

MCOCA
Pimpri Chinchwad Water Wastage: पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याची नासाडी सुरूच; एक दिवसाआड पुरवठ्यातही असमानता

अभय बाबासाहेब पाटील (रा. कोल्हापूर), शिवतेज राजेंद्र पोटे (रा. वाघोली, पुणे), युवराज ऊर्फ संतोष सतीश मुदलियार (रा. लोहगाव, पुणे), रॉनी ऊर्फ पंकज मंगू गिरीगोस्वामी (रा. उदयपूर, राजस्थान), प्रल्हाद पृथ्वीराज गाडरी (रा. उदयपूर, राजस्थान), उमेश लक्ष्मीलाल भट्ट (रा. राजस्थान), महेश करबसपा उडचणे (रा. दहिसर, मुंबई), राहुल बहादूरप्रसाद मौर्य (रा. दहिसर, मुंबई), शेख अब्दुल रहिस शेख अब्दुल रशीद (रा. औरंगाबाद) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

MCOCA
Pimpri Accepted Corporators Election Delay: पिंपरीत स्वीकृत नगरसेवक निवड पुन्हा लांबणीवर; भाजपमधील मतभेद ठरले अडथळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 फेब्रुवारी 2026 रोजी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिस ठाण्यात एका सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केली होती. बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे त्यांना शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांची 11 कोटी 13 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून यातील 2 कोटी 65 लाख 76 हजार रुपये विविध बँक खात्यांमध्ये गोठवले होते, जे आता न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादींना परत मिळणार आहेत.

MCOCA
Pimpri Red Zone Property Sale Permission: शासनाच्या परिपत्रकाने संभ्रम दूर; अडकलेले व्यवहार मार्गी, नोंदणी प्रक्रिया सुलभ

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कोल्हापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि राजस्थानमधील उदयपूर येथून नऊ जणांना अटक केली. या आरोपींनी संघटित टोळी बनवून सर्वसामान्यांची फसवणूक केली होती. तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या संपर्कात होते. फसवणुकीची रक्कम ते युएसडीटीसारख्या आभासी चलनामध्ये वर्ग करत असत. डिजिटल माध्यमांचा वापर करून त्यांनी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर मध्य प्रदेशातही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर एकापेक्षा जास्त गुन्हे दाखल असल्याने ही संघटित गुन्हेगारी असल्याचे स्पष्ट झाले.

MCOCA
Pimpri RTO NH Series Fancy Number: पिंपरी आरटीओत दुचाकींसाठी ‘एनएच’ नवी मालिका; आकर्षक क्रमांकासाठी अर्जाची संधी

सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे यांनी या टोळीवर मकोका लावण्याचा प्रस्ताव सादर केला होता. कागदपत्रांच्या छाननीनंतर अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.

ही कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलिस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त (प्रादेशिक विभाग) बसवराज तेली, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे 1) विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलिस निरीक्ष प्रवीण स्वामी यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news