Duplicate Voters Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Duplicate Voters: पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल 92 हजार दुबार मतदार! बोगस मतदानाची भीती वाढली

मतदार यादीतील मोठ्या तुटवड्यावर विरोधकांचा हल्लाबोल; बोगस मतदान रोखण्याचे महापालिकेसमोर मोठे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 17 लाख 12 हजार 151 मतदार असून, त्यातील 92 हजार 664 पेक्षा अधिक मतदारांची नावे दुबार आहेत. तर, 999 मतदारांची नावे डिलिट करण्यात आली आहेत. दुबार मतदारांच्या नावावर बोगस मतदान होऊ शकतो, असा आरोप विरोधकांनी केला आहे. बोगस मतदान रोखण्याचे महापालिका प्रशासनासमोर आव्हान आहे.

पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि भोर विधानसभा मतदारसंघातील 1 जुलै 2025 पर्यंत नोंद झालेल्या मतदार याद्या राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेस दिल्या आहेत. त्यानुसार, शहरात एकूण 17 लाख 12 हजार 151 मतदार आहेत. त्यात 9 लाख 5 हजार 728 पुरुष मतदार, तर 8 लाख 7 हजार 966 महिला मतदार आहेत. एकूण 197 तृतीयपंथी मतदार आहेत. महापालिकेने 1 ते 32 प्रभागानुसर मतदार यादी फोडून त्या 20 नोव्हेंबरला प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या. त्यासोबत शहरातील दुबार मतदारांची यादीही प्रसिद्ध केली आहे.

शहरात तब्बल 92 हजार 664 दुबार मतदार असल्याचे राज्य निवडणूक आयोग व महापालिकेने मान्य केले आहे. एका मतदाराचे नाव यादीत तब्बल दोन वेळा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा आहे. त्यामुळे शहरातील मतदारांची संख्या फुगली आहे. मात्र, प्रत्यक्षात ही संख्या अधिक असल्याचे आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग््रेासने केला आहे. शहरात मोठ्या संख्येने दुबार मतदार असल्याने महापालिका निवडणुकीत बोगस मतदान होण्याची दाट शक्यता आहे. जिंकून येण्यासाठी दुबार मतदारांच्या नावाचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे पराभवाचा सामना कराव लागू शकतो. दुबार मतदारांची नावे यादीतून वगळावी, अशी तक्रार दोन्ही राष्ट्रवादी काँग््रेासने केला आहे.

चौदा दिवसांच्या हरकती व सूचना दाखल करण्याच्या मुदतीमध्ये केवळ 23 हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. आपले नाव दुबार आहे, हे अनेक मतदारांना माहित नाही. मतदारांमध्ये उत्साह नसल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सर्वांधिक तक्रारी व हरकती राजकीय पक्ष, माजी नगरसेवक व इच्छुकांकडून दाखल करण्यात आल्या आहेत.

दुबार नावे यादीतून तात्काळ हटवा

मतदार यादीतील दुबार नावे तातडीने वगळावी. त्यामुळे त्या नावावर बोगस मतदान होणार नाही. तसे केल्याने शहराची खरोखर असलेली मतदार संख्या समोर येईल, अशी तक्रार विरोधकांकडून करण्यात आली आहे. त्याबाबत राज्य निवडणूक आयोग तसेच, महापालिका प्रशासन काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाला मतदार यादीतून नाव वगळण्याचा किंवा समाविष्ट करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे सांगत हात झटकले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

अनेकांची नावे शहराबाहेरील मतदारसंघात

शहरातील अनेक मतदारांची नावे शहराबाहेरील विधानसभा मतदार संघात समाविष्ट करण्यात आले आहेत. मतदारांची कोणतेही चूक नसताना तसेच, स्थलांतराचा अर्ज भरलेल्या नसताना असा प्रकार घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अशा मतदारांना पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक मतदान करता येणार नाही. तसेच, महापालिका निवडणूक लढता येणार नाही. राज्य निवडणूक यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना निवडणुकीपासून दूर सारण्याचा हा प्रकार लोकशाहीस घातक असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दुबार मतदारांच्या नावापुढे चिन्हांकित केल्याने बोगस मतदान होणार नसल्याचा दावा

एकाच व्यक्तीचे अनेक वेळा नाव असल्यास मतदार यादीत त्या मतदारांच्या नावापुढे दोन स्टार चिन्हे छापली जाणार आहेत. त्यामुळे त्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे. मतदान केल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी मतदान करणार नाही, असे हमीपत्र त्या मतदारांकडून लिहून घेतले जाणार आहे. त्यामुळे बोगस मतदान होणार नाही, असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

तपासणीसाठी 64 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

राज्य निवडणूक आयोगाकडून दुबार मतदारांची नावे काढण्यात आली आहेत. एकूण 92 हजार 664 दुबार मतदारांची नावे आहेत. एकाच मतदारांचे नाव अनेक वेळा यादीत आहे. समान नावे असलेल्या मतदारांची महापालिकेकडून पडताळणी केली जात आहेत. सारखे नाव असलेली व्यक्ती एकच की वेगवेगळी आहे, ते तपासले जात आहेत. त्यासाठी महापालिकेच्या निवडणूक विभागाने एका क्षेत्रीय कार्यालयासाठी 8 असे एकूण 64 कर्मचारी नेमले आहेत. त्यावर उपायुक्त व क्षेत्रीय अधिकारी देखरेख करीत आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT