Pimpri Chinchwad Census 2027 Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Census 2027: पिंपरी-चिंचवडमध्ये जनगणना 2027 सुरू; हलगर्जीपणावर कारवाईचा इशारा

घरमोजणी व घरसूची कामात निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही; नागरिकांनी अचूक माहिती देण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात घरमोजणी व जनगणनेचे काम सुरू झाले आहे. त्या कामात निष्काळजीपणा, टाळाटाळ किंवा हलगर्जीपणा केल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसे आदेश महापालिकेचे आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

जनगणना 2027 अंतर्गत सुरू असलेल्या घरसूची व घरमोजणीस सुरुवात झाली आहे. त्या कामाचा आढावा आयुक्तांनी घेतला. त्या बैठकीस अतिरिक्त अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर,

मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, प्रेरणा सिनकर, मनोज सेठिया, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी सचिन पवार, डॉ. प्रदीप ठेंगल, राजेश आगळे, व्यंकटेश दुर्वास, क्षेत्रीय अधिकारी आदी उपस्थित होते.

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे

आयुक्त सूर्यवंशी म्हणाले, की कर्मचाऱ्यांकडून या कामात टाळाटाळ खपवून घेतला जाणार नाही. ही प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करावी. जनगणनेदरम्यान माहिती संकलन, नोंदींची अचूकता व प्रशासकीय कामकाजामध्ये दक्षता बाळगावी. उपायुक्त सचिन पवार म्हणाले म्हणाले, की जनगणनेच्या कामकाजात नागरिकांनी अचूक माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, प्रगणकांनी माहिती जमा करताना नियमांचे पालन करावे.

प्रगणक, पर्यवेक्षक आणि संबंधित विभागांनी समन्वय राखून नागरिकांशी संवाद साधत जनगणनेची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. प्रत्येक नोंद विश्वसनीय व त्रुटीविरहित राहण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने देखरेख व मार्गदर्शन केले जात आहे.
सचिन पवार, उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT