PCMC E Pass System: पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रवेशासाठी ‘स्वागतम ई पास’ अनिवार्य

QR कोड आधारित ऑनलाईन प्रणाली सुरू; 7,894 नागरिकांनी आतापर्यंत नोंदणी करून घेतला प्रवेश
PCMC E Pass System
PCMC E Pass SystemPudhari
Published on
Updated on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात प्रवेश देण्यासाठी 1 मेपासून ‌‘स्वागतम ई पास‌’ ही ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. पास असल्याशिवाय महापालिकेत प्रवेश दिला जात नाही. आत्तापर्यंत एकूण 7 हजार 894 जणांनी पास काढून महापालिका भवनात प्रवेश केला आहे.

PCMC E Pass System
Lawrence Bishnoi Gang Sleeper Cell: लॉरेन्स बिष्णोई गँगचे ‘स्लीपर सेल’ सक्रिय; पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर मोठे आव्हान

पाससाठी नागरिकांना महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मुख्य इमारत प्रवेश प्रणाली या लिंकद्वारे आपली नोंदणी करावी लागते. ऑनलाइन नोंदणीसाठी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असून, नागरिकांनी या नव्या डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

PCMC E Pass System
Pune SRA TDR Scam: पुणे- पिंपरीत एसआरए टीडीआर घोटाळ्याचा पर्दाफाश

नोंदणी केल्यानंतर 7 दिवसांपर्यंत (शनिवार, रविवार आणि शासकीय सुटी वगळता) महापालिकेत प्रवेश करता येणार आहे. त्यानुसार, इच्छित दिनांक व संबंधित विभाग निवडून नोंदणी करता येईल.

PCMC E Pass System
Pimpri Chinchwad Crime: चिंचवड बसथांब्यावर तरुणीसमोर अश्लील कृत्य; परिसरात खळबळ

नोंदणी पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर क्युआर कोड डाउनलोड करता येईल. हा क्युआर कोड प्रवेशद्वारावर दाखविल्यानंतर तो स्कॅन करून प्रवेश दिला जातो.

PCMC E Pass System
Pimpri Chinchwad Traffic Problem: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक कोंडीचा कहर; खोदकाम व अतिक्रमणामुळे नागरिक हैराण

नागरिक त्यांच्या लॉगिन अकाऊंटवरून क्युआर कोड कधीही डाउनलोड करू शकतात. आगाऊ तारखेसाठी नोंदणी केल्यास क्युआर कोड डाउनलोड करण्याची सुविधा संबंधित प्रवेशाच्या दिवशी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news