पिंपरी: पिंपरी येथील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत रविवार (दि. 10) बाजारात वाढत्या उन्हामुळे उत्पादन कमी असल्याने पालेभाज्यांचे दर वाढले आहेत, तर गेल्या आठवड्याप्रमाणे फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.
कोथिंबीर व मेथीची जुडी 40 रुपये दराने विक्री केली जात आहे. गवार, शेवगा 50 - 60 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे, वांगी व फ्लॉवर 40 - 50 रुपये किलोचा दर आहे. मिरची 60, कर्नाटक कैरी 50 - 60 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. कांदा 100 रुपयांना पाच किलो प्रमाणे विक्री केली जात आहे. लसूण 100 - 150, तर आले 80 - 90 रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.
फळभाज्यांचे दर पुढील प्रमाणे :
रविवारी बाजारात गवार 70 रुपये, शेवगा 60, टोमॅटो 25, भेंडी 50, फ्लॉवर 30, कोबी 30, मिरची 50, गाजर 25, शिमला 60, लसूण 100 - 120, आले 70, वांगी 40, काकडी 40, कारले 70, कांदे 20 - 25 किलो, बटाटा 25- 30 रुपये किलो, बिन्स 60, पावटा 70, लाल भोपळा 30, घोसाळी 60, दोडका 70, तोंडली 70, बीट 50, दुधी 40, घेवडा 60 रुपये.
पिंपरी बाजारातील दर पालेभाज्यांचे दर (रु.) प्रति जुडी
कोथिंबीर 40 रुपये, मेथी 30, पालक 30, शेपू 30, राजगिरा 30, पुदिना 10, मुळा 30, चवळई 20, लाल माठ 15, कांदापात 30, करडई 15, आळू पाने 15 रुपये जुडी, आंबट चुका 30 रुपये.
फळभाज्यांचे : किलोचे भाव (किरकोळ रु.)
शेवगा 80 रुपये, गवार 80, वाटाणा 120 - 150, पावटा 70, तोंडली 80, बीट 60, दोडका 80, कारली 80, भरताची वांगी 50, भेंडी 70 रूपये, मिरची 80, फ्लॉवर 50, कोबी 40 , वांगी 70, घोसाळे 60, पडवळ 100, दुधी भोपळा 50, पापडी 60, परवल 80, सुरण 80 रूपये, मद्रास काकडी 40, सिमला 80 रुपये, राजमा 80, बिन्स 80, गाजर 50, रताळी 70, टोमॅटो 30, काकडी 50 रुपये किलो असे दर आहेत.
मोशी उपबाजारातील घाऊक दर (प्रतिकिलो रु.)
कांदा 7, बटाटा 9, लसूण 80, आले 35, भेंडी 25, गवार 45, टोमॅटो 12, वाटाणा 75, घेवडा 40, दोडका 35, हिरवी मिरची 35, दुधी भोपळा 10, काकडी 25, कारली 35, गाजर 15, फ्लॉवर 25, कोबी 20, वांगी 25, बीट 20, शेवगा 35, घोसाळी 30, लिंबू 90, मका कणीस 50 रुपये प्रतिकिलो दर होते.
मोशी उपबाजारातील दर, आवक (क्विंटल)
फळभाजी 4529, पालेभाजी 27900 (गड्डी), फळे आवक 819, कांदा 608, बटाटा 1644, आले 15, लसूण 43, भेंडी 101, गवार 25, टोमॅटो 529, वाटाणा 10, घेवडा 42, दोडका 22, हिरवी मिरची 96, दुधी भोपळा 67, काकडी 125, कारली 21, डांगर 64, गाजर 96, फ्लॉवर 371, कोबी 208, वांगी 77, ढोबळी 35, बीट 5, शेवगा 31, लिंबू 50, मका कणीस 70, तोंडली 10, रताळी 0 क्विंटल अशी आवक झाली.