MSRTC Smart Card Pudhari
पिंपरी चिंचवड

MSRTC NCMC Card: एसटीच्या एनसीएमसी कार्डधारकांना तिकीट नाकारणे महागात पडणार; वाहकांवर कारवाईचा इशारा

कार्ड स्वीकारण्यास टाळाटाळ किंवा तांत्रिक कारणे सांगून सवलत नाकारल्यास कठोर कारवाई; एनसीएमसी कार्डची मुदत १ सप्टेंबरपर्यंत

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस.टी) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्डसाठी (एनसीएमसी ) १ सटेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक मार्गांवर वाहकांकडून प्रवाशांचे हे कार्ड स्वीकारण्यास नकार दिला जात आहे. प्रवाशांना सवलतीचे तिकीट देण्यास टाळाटाळ करणे, तांत्रिक कारणांची बतावणी करत प्रवाशांची अडवणूक करणे असे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

एनसीएमसी हे एक स्मार्ट कार्ड आहे. हे कार्ड फक्त ओळखपत्र नसून, प्री- पेड वॉलेट म्हणून काम करते. यावर टॅप करून तिकीट काढता येते, तिकीट सवलत मिळते आणि व्यवहार पारदर्शक होतात. प्रवाशांच्या वाढत्या मागण्या व तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मात्र, काही बसमार्गांवर वाहकांकडून प्रवाशांचे एनसीएमसी कार्ड मशीनवर स्कॅन करण्यास नकार देणे, मशीन चालत नाही किंवा तांत्रिक बिघाड आहे असे कारण पुढे करत सवलतीचे तिकीट नाकारणे, असे प्रकार कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. वाहकांची तक्रार करण्याची संबंधीत बसचा क्रमांक, मार्ग, वाहकाचे नाव, व वेळ नमूद करुन एसटीच्या टोल- फ्री क्रमाकांवर किंवा नजीकच्या विभाग नियंत्रक कार्यालयाकडे लिखित स्वरुपात तक्रार नोंदवावी, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

एसटीतून प्रवास करणाऱ्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या किंवा सवलतीच्या अधिकारापासून वंचित ठेवणाऱ्या वाहक आणि आगार प्रमुखांना महामंडळाने सक्त ताकीद दिली आहे. एसटी महामंडळाच्या प्रवाशांच्या तक्रारीची खात्री पटल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर खात्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यईल. असे प्रकार घडल्यास प्रवाशांनी तक्रार करावी. असे आवाहन एस.टी. च्या आधिकाऱ्यांनी केले आहे.

विनाकारण त्रास देण्याऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. तिकीट सवलतीसाठी अनेक प्रवाशांना एनसीएमसी कार्ड उपलब्ध झालेले आहे. कार्डद्वारे तिकीट मागणी करणाऱ्या प्रवाशांना तिकीट देणे बंधनकारक आहे.
वैशाली कांबळे, स्थानक प्रमुख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT