

उर्से मावळ: पवन मावळ परिसरातील विविध भागात रंगीबेरंगी राख्यांची दुकाने सजली आहेत. तर, बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. महिलांना या राख्या भुरळ घालत असून, राख्या खरेदीसाठी महिला बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहे; पण यंदा महागाईमुळे राख्यांच्या दरांमध्ये सुमारे १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारात छोटा भीम, डोरेमॉन, मोटू पतलू, श्री गणेशा, श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्रीस आल्या असून, याची खरेदी करण्याकडे महिलांचा कल दिसत आहे.
दरात वाढ
बहीण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला सण रक्षाबंधन शुक्रवारी (दि. २८) साजरा होणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. महिलांना या राख्या भुरळ घालत असून, राख्या खरेदीसाठी महिला बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहे. पण यंदा महागाईमुळे राख्यांच्या दरांमध्ये सुमारे २० टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
भाऊना राखी पोचण्यासाठी महिलांची लगबग
रक्षाबंधननिमित्ताने बाजारपेठ सजले असून, महिलावर्ग ही राखी खरेदीसाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. परदेश तसेच शहराबाहेर कामानिमित्त असलेल्या भाऊना वेळेत राखी पोचण्यासाठी आत्तापासूनच राखी खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. तसेच पोस्ट ऑफिसमध्ये व कुरिअरनेसुद्धा गर्दी पहायला मिळत आहे. चांगल्यात चांगली आणि आकर्षक राखी खरेदीस महिलांकडून पसंती दिली जात आहे.
यंदा बाजारात विविध प्रकारांच्या राख्या दाखल
यंदा बाजारात चिमुकल्यांसाठी लायटिंग राख्या, छोटा भीम, डोरेमॉन, मोटू पतलू, श्री गणेशा, श्रीकृष्ण अशा राख्या बाजारात विक्रीस आल्या आहे. लायटिंग, लाकडी, पपेट, कडा राखीसह पारंपारिक देव राखी अशा विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीस आले आहे. तसेच विविध प्रकारचे राख्या हे बाजारात दाखल झाले आहे. तसेच, सध्या पारंपरिक राख्या खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून येत नाही.
व्यावसायिकांसाठी खुशी तर ग्राहकांसाठी खिशाला कात्री
यंदाच्या रक्षाबंधनला व्यावसायिकांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण आहे. किरकोळ विक्रेते आणि सामान्य नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. सुमारे ७० ते ८० टक्क्यांनी ग्राहक वाढले असल्याची माहिती या वेळी व्यावसायिकांकडून देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी जरी रक्षाबंधनला ग्राहक वाढले असले तरी महागाईचा फटका यंदाच्या रक्षाबंधनला बसला असून, यंदा रख्यांच्या किंमतीमध्ये २० टक्के एवढी वाढ झाली आहे.