Shri Nageshwar Maharaj Yatra Pudhari
पिंपरी चिंचवड

Moshi Shri Nageshwar Maharaj Yatra: श्री नागेश्वर महाराज यात्रेत ‘मानाचा विडा’ 25 लाखांना; लिलावातून दीड कोटींहून अधिक निधी

भाविकांची सढळ बोली; मानाची ओटी, लिंबू आणि इतर वस्तूंनाही लाखोंची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मोशी: येथील ग््राामदैवत श्री नागेश्वर महाराज यात्रा आणि भंडारा उत्सवानिमित्त आयोजित पारंपरिक लिलावात यंदा श्रद्धेचा मोठा पूर पाहायला मिळाला. शिवरात्रीपासून सुरू झालेल्या या उत्सवात शुक्रवारी पार पडलेल्या लिलावप्रक्रियेत भाविकांनी सढळ हाताने बोली लावली. या लिलावात सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ‌‘मानाचा विडा‌’ तब्बल 25 लाख रुपयांना गेला. भाविक विजय पांडुरंग सस्ते यांनी ही विक्रमी बोली लावून विड्याचा मान मिळवला आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला. या वेळी मंदिर सभागृहात भाविकांनी टाळ्यांच्या गजरात आणि जयघोषात परिसर दणाणून सोडला होता.

यात्रेच्या निमित्ताने आयोजित या लिलावात केवळ विडाच नाही, तर इतर वस्तूंनाही लाखो रुपयांची बोली लागली. मानाची ओटी मिळवण्यासाठी भाविकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. जी अखेर आकाश विष्णू सस्ते यांनी 15 लाख 11 हजार 101 रुपयांना घेतली.

लिलावातील शेवटच्या लिंबू फळासाठी स्वप्निल दत्तात्रेय सासवडे यांनी 10 लाख 11 हजार 105 रुपयांची बोली लावून सर्वांना थक्क केले, तर मानाचे पहिले लिंबू संभाजी बबन बोऱ्हाडे यांनी 2 लाख 11 हजार रुपयांना घेतले. याशिवाय मानाचा पहिला विडा योगेश गुलाब बोराटे यांनी 2 लाख 51 हजार रुपयांना आपल्या नावे केला. केदारी कुटुंबाने परंपरेनुसार या लिलावाचे कामकाज पाहिले.

सकाळी दहा वाजतापासून सुरू झालेल्या या लिलावात श्री नागेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण केलेल्या वस्तू, सोन्या-चांदीचे दागिने आणि भंडाऱ्यातील प्रसादाचा समावेश होता. या संपूर्ण प्रक्रियेतून यंदा दीड कोटी रुपयांहून अधिक निधी जमा झाला असून, देवाच्या दारात पैशापेक्षा श्रद्धेला मोठे मोल असते याचा प्रत्यय मोशीकरांनी पुन्हा एकदा आणून दिला.

दरवर्षी भंडाऱ्यासाठी लागणारी भांडी ग््राामस्थांकडून नव्याने खरेदी केली जातात. ही परंपरा यंदाही जपण्यात आली. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग््राामस्थ आणि भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत भक्तिमय आणि जल्लोषात पार पडला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT