संतोष शिंदे
पिंपरी : वजन झटपट कमी करण्याच्या आमिषाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा आंतरराष्ट्रीय औषधाचे रॅकेट समोर आले आहे. सध्या केवळ क्लिनिकल चाचणीच्या टप्प्यात असलेले ‘कॅग्रिलिंटाइड’ (उरसीळश्रळपींळवश) हे औषध अनधिकृतपणे बाजारात आल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व पोलिस यंत्रणांना ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.
जागतिक औषध निर्माता र्छेेीं छेीवळीज्ञ यांच्या संशोधनाखाली असलेले ‘कॅग्रिलिंटाइड’ हे औषध सध्या क्लिनिकल ट्रायलमध्ये असून, त्याच्या चाचण्या सन 2026 पर्यंत सुरू आहेत. हे औषध भविष्यात वजनकपातीसाठी वापरात येणार असले तरी, अद्याप कोणतीही अधिकृत विक्री मान्यता मिळालेली नाही. दरम्यान, 18 सप्टेंबर 2025 रोजी आयर्लंडमध्ये या औषधाचा साठा जप्त करण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरील औषध तस्करीचे जाळे सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अपूर्ण चाचणीतील औषधांचे सेवन केल्यास नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, तसेच जीवितासही धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचा ठळक इशारा इंटरपोलने दिला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महासंचालक कार्यालयाने महाराष्ट्रातील सर्व पोलिस आयुक्त, पोलीस अधीक्षक, गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा तसेच इंटरपोल समन्वय अधिकाऱ्यांना पाठवून आवश्यक ती प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यात ऑनलाईन औषध विक्री प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया जाहिराती, टेलिग्राम व व्हॉट्सॲप ग्रुप्स, जिम, फिटनेस व वेलनेस सेंटर्स, अनधिकृत मेडिकल स्टोअर्स यांच्यावर बारकाईने नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आयात-निर्यात मार्ग, कुरिअर सेवा, संशयास्पद पार्सल शिपमेंट यांची तपासणी वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. बेकायदेशीर साठा, वितरण किंवा विक्री आढळून आल्यास कायद्यांतर्गत तात्काळ कारवाई करून वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, क्लिनिकल ट्रायलमध्ये असलेली औषधे संपूर्ण सुरक्षिततेच्या चाचण्या पूर्ण न झालेली असल्याने, त्यांचा वापर अत्यंत धोकादायक ठरू शकतो. अशी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेतल्यास हृदयविकार, हार्मोनल असंतुलन, तीव्र साइड इफेक्ट्स निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी झटपट वजन कमी करण्याच्या आमिषाला बळी न पडता सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
‘कॅग्रिलिंटाइड’बाबत पत्र प्राप्त झाले आहे. अशा प्रकारची क्लिनिकल ट्रायलमध्ये असलेली कोणतीही औषधे बाजारातून खरेदी करणे किंवा वापरणे हे आरोग्यास अत्यंत धोकादायक आहे. अशा औषधांची विक्री अथवा जाहिरात आढळल्यास तात्काळ नजीक पोलिसांना माहिती द्यावी.सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड
काय करावे
फक्त परवानाधारक मेडिकल स्टोअरमधूनच औषधे खरेदी करावीत
वजन कामी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा
सल्ला घ्यावा
संशयास्पद औषध विक्रीची माहिती पोलिसांना द्यावी
काय करू नये
सोशल मीडिया जाहिरातींवर विश्वास ठेवून औषधे खरेदी करू नयेत
क्लिनिकल ट्रायलमधील, परदेशातून आलेली औषधे वापरू नयेत
डॉक्टरांच्या सल्ल्याविना इंजेक्शन किंवा हार्मोनल औषधे घेऊ नयेत