PMRDA Development Plan: पीएमआरडीएचा विकास आराखडा रखडला; स्ट्रक्चरल प्लॅनअभावी ९ तालुक्यांचा विकास ठप्प

अधिकाऱ्यांच्या नियुक्तीअभावी काम थांबले, निवडणूक आचारसंहितेने विलंबात भर
PMRDA
PMRDA Pudhari
Published on
Updated on

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा विकास आराखडा रद्द झाल्यानंतर झालेला गोंधळ अद्याप दूर होईना. प्राधिकरणातील समाविष्ट तालुक्यांचा, गावांतील कामांच्या अनुषंगाने या हद्दीचा आरखाडा तयार करा, अशा सूचना राज्य शासनाने पीएमआरडीए दिले होते. त्याच धर्तीवर स्ट्रकचरल प्लॅनच्या आधारे कामे करावीत, असे सांगून मुख्यमंत्री तथा पीएमआरडीएचे अध्यक्ष देेवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले होते. पण, आधी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती त्यानंतर निवडणुका आणि त्यावरील प्लानचे कामच नसल्याने प्लानचे काम रखडले आहे.

PMRDA
PM SHRI School: पालिकेच्या शाळांमध्ये हायटीच शिक्षणाचा नवा अध्याय; पीएमश्री योजनेत दोन शाळांची निवड

या प्रकल्पाला पीएमआरडीएकडून वेळ मिळत नसल्याने ते लांबणीवर पडले असून, आता त्यावर पुढील दोन महिने काम सुरु होऊ शकत नाही. त्यामुळे पीएमआरडीएच्या हद्दीत रस्त्यांची जाळे, प्रकल्प, उड्डाणपूल अथवा पायाभूत सुविधा उभारण्यास विलंब होत आहे. पीएमआरडीएने सात हजार चौरस किलोमीटरचा विकास आरखडा तयार केला होता. त्यावर वादंग निर्माण झाल्याने तसेच, त्यावर हरकती आल्याने अखेर राज्य शासनाने तो रद्द केला. मात्र, हा निर्णय घेताना यापुढील काळात विकास आराखडा तयार करण्यापूर्वी स्क्ट्रकचल प्लान तयार करावा, अशा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, यासाठी एमआरटीपी ॲक्टमध्ये शासनाकडून बदल देखील करण्यात आला होता. त्यानुसार नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी त्यात तरतूद आहे.

PMRDA
Pimpri Chinchwad water supply: शहराचा पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी महापौर रवी लांडगे यांची जलशुद्धीकरण केंद्रांना भेट

आराखडा रद्द झाल्यानंतर स्ट्रकचरल प्लान तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असा प्रस्ताव प्राधिकरणाने पाठवला. त्यावर अद्याप मान्यता मिळाली नाही. अधिकाऱ्यांची नेमणूक न झाल्याने त्याचे काम थांबले असून, त्यावर अद्याप कोणताचा निर्णय होत नाही. किंबहुना प्राधिकरणाचे अधिकारी देखील त्यावर कोणताही प्रक्रिया करत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे जोपर्यंत हा प्लान तयार होत नाही. तोपर्यंत विकास आराखडा व एकूणच 9 तालुक्यांतील कामे देखील काही प्रमाणात लांबणीवर पडणार आहेत. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरालगत असणाऱ्या गावांचा विकास रखडेल.

PMRDA
PCMC Standing Committee: स्‍थायी समितीसाठी नगरसेवकांची भाऊगर्दी !

आधीच उशीर आता, आचारसंहितेचे कारण

विकास आरखाडा रद्द झाल्यानंतर प्रत्यक्षात स्ट्रक्चर प्लानवर काम होणे अपेक्षित होते. पण, या ना त्या कारणाने उशिर होत गेला आता. पुन्हा, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकांमुळे पुढे ढकलण्यात येत आहे. आता या विषयांवर स्वतंत्र बैठक घेण्याचे नियोनज केले असले तरी, प्रत्यक्षात अंमलबाजवणी होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news