तळेगाव दाभाडे : विविध नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत या भागातील निवडणुका रद्द करून मतदान स्थगित केले आहे.
आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सुधारित निवडणूक कार्यक्रम जारी करून याबाबतचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या 6 जागांवरील उमेदवारांना थेट दणका बसला आहे.
या स्थगितीमुळे तळेगाव दाभाडे नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक २, ४ आणि १० मधील प्रत्येकी एका जागेसह प्रभाग क्रमांक ८ मधील दोन्ही जागांवरील निवडणूक प्रक्रिया थांबली आहे.
न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणूक आयोगाला काही नगर परिषदांच्या जागांच्या आरक्षणाबाबत फेरविचार करावा लागला आहे. ज्या जागांवर अपील दाखल झाले होते, त्या जागांवरील सार्वत्रिक निवडणुका रद्द करण्यात आल्या आहेत, तसेच तेथील मतदान तात्काळ प्रभावाने थांबवण्यात आले आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेवर परिणाम:
स्थगित जागा: प्रभाग २, ४, १० (प्रत्येकी १ जागा) आणि प्रभाग ८ (२ जागा).
एकूण जागा: ५ जागा.
या जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि प्रचार करणे यासह सर्व प्रक्रिया उमेदवारांनी पूर्ण केली होती. मात्र, अचानक आलेल्या या आदेशामुळे सर्व उमेदवारांमध्ये आणि स्थानिक राजकारणात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.