Bribe Corruption|Pimpri ACB Trap Pudhari
पिंपरी चिंचवड

Dighi Police ACB Trap: दिघी पोलिस ठाण्यातील महिला फौजदार लाच घेताना रंगेहाथ अटकेत; ८ लाखांची मागणी, ३ लाख स्वीकारले

‘बी फायनल’ अहवालासाठी तडजोडीने घेत होती लाच; एसीबीच्या पथकाची पोलिस ठाण्यातच कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: दिघी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करून न्यायालयात 'बी फायनल' अहवाल सादर करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना दिघी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ अटक केली.

ही कारवाई बुधवार (दि. १५) सायंकाळी दिघी पोलिस ठाण्याच्या आवारात करण्यात आली. चैताली बाबासाहेब गपाट (४२, रा. ग्रँड बे सोसायटी, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्या महिला पोलिस फौजदाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास फौजदार चैताली गपाट यांच्याकडे होता. संबंधित प्रकरणात फिर्याद खोटी असल्याचा 'बी फायनल' अहवाल न्यायालयात सादर करून तक्रारदाराला मदत करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला आठ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत ३५ वर्षीय तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

एसीबीच्या पथकाने १४ आणि १५ जुलै रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यामध्ये तडजोडीनंतर तीन लाख रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बुधवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास दिघी पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा रचण्यात आला.

तक्रारदाराकडून तीन लाख रुपयांची लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना एसीबीच्या पथकाने चैताली गपाट यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT