देहूरोड: देहूरोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रुग्णालयातील सोनोग््रााफी मशीन मागील तीन महिन्यांपासून डॉक्टर नसल्यामुळे बंद असल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अल्पदरात उपलब्ध असलेली सोनोग््रााफी सेवा बंद असल्यामुळे गोरगरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे जावे लागत असून, त्यांना आर्थिक, मानसिक तसेच वेळेचा त्रास सहन करावा लागत आहे.
या रुग्णालयात गर्भवती महिला, अपघातग््रास्त रुग्ण, पोटदुखी, किडनी स्टोन तसेच विविध आजारांच्या तपासणीसाठी दररोज रुग्ण येतात. शासकीय रुग्णालयात कमी खर्चात सोनोग््रााफी होत असल्याने ही सेवा नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची होती. मात्र, मागील तीन महिन्यांपासून मशीन बंद असल्याने रुग्णांना 2 ते 3 हजार रुपये खर्च करून खासगी सोनोग््रााफी केंद्रात तपासणी करावी लागत आहे.
गर्भवती महिलांची विशेष गैरसोय
सोनोग््रााफी ही गर्भवती महिलांसाठी अत्यावश्यक तपासणी असून, वेळेवर तपासणी न झाल्यास माता व गर्भाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ग््राामीण व दूरच्या भागातून येणाऱ्या महिलांना अतिरिक्त प्रवास खर्च, तपासणीचा खर्च आणि वेळेचा फटका बसत आहे.
सोनोग््रााफी मशीन उपलब्ध असले तरी तज्ज्ञ सोनोग््रााफी डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे ही सेवा सध्या बंद आहे. याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. पुढील निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन घेईलडॉ. श्रीनिवास चाटे, निवासी वैद्यकीय अधिकारी
रुग्णालय प्रशासनाने तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून सोनोग््रााफी सेवा सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते त्याचप्रमाणे रुग्ण व सामाजिक संघटनांकडून होत आहे. शासकीय रुग्णालय हे सामान्य जनतेचा आधार असल्याने अशा अत्यावश्यक आरोग्य सेवा बंद राहणे दुर्दैवी आहे.शकुंतला अगरवाल, सामाजिक कार्यकर्त्या