Tukaram Maharaj Beej Sohala Preoaration Pudhari
पिंपरी चिंचवड

Dehu Tukaram Maharaj Beej Sohala: देहूनगरी सज्ज! संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व व्यापक तयारी

34 सीसीटीव्ही कॅमेरे, 16 पाणी टँकर, 96 फिरती शौचालये; लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी प्रशासन तत्पर

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव: जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमन (बीज) सोहळ्यानिमित्त गुरुवार, दि. 5 मार्च रोजी देहूनगरीत लाखो वारकरी भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या स्वागतासह सुरक्षेच्या दृष्टीने देहूनगर पंचायत प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.

सोहळा सुरळीत व सुरक्षित पार पडावा, चोरी किंवा अनुचित प्रकारांना आळा बसावा तसेच आपत्कालीनप्रसंगी त्वरित कार्यवाही करता यावी यासाठी मोक्याच्या ठिकाणी एकूण 34 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कचरा डेपो येथे दोन, एसटीपी प्लांटवर दोन तसेच गर्दीच्या प्रमुख ठिकाणी अतिरिक्त कॅमेरे बसवून संपूर्ण सोहळा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे.

स्वच्छतेच्या दृष्टीने मुख्य कमान, मंदिर परिसर, तसेच 14 टाळकरी मार्ग पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात आले आहेत. घाट, मुख्य व अंतर्गत रस्ते तसेच बाह्यवळण मार्गावरील खड्डे बुजवून डागडुजीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सफाई कर्मचारी सातत्याने स्वच्छता मोहीम राबवत आहेत.

वारकऱ्यांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून गर्दीच्या ठिकाणी 16 टँकर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच सुमारे 96 फिरती शौचालये उभारण्यात येत असून, सुलभ शौचालयांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तीन अग्निशामक बंब तैनात ठेवण्यात आले आहेत.

एकूणच, बीज सोहळ्यानिमित्त भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी देहूनगर पंचायतीकडून सर्वतोपरी नियोजन करण्यात आले असून सुरक्षित, स्वच्छ आणि सुव्यवस्थित सोहळ्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT