Chinchwad Railway Flyover Pudhari
पिंपरी चिंचवड

Chinchwad Railway Flyover: चिंचवड स्टेशनचा जुना रेल्वे उड्डाण पूल पाडणार; ५५.४० कोटींचा नवा पूल उभारणार

महावीर चौक ते चिंचवड गाव प्रवास होणार सुलभ; ५३८ मीटर लांबीच्या पुलाचे काम अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड स्टेशन येथील जुना रेल्वे उड्डाण पूल पाडण्यात येणार आहे; तसेच त्याठिकाणी नवा उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ५५ कोटी ४० लाख रुपये खर्चाची निविदा महापालिकेने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे चिंचवड स्टेशनच्या महावीर चौकातून चिंचवड गावाच्या दिशेने जाणे सुलभ होणार आहे.

पुणे-मुंबई जुन्या महामार्गाच्या निगडी ते दापोडी मार्गावरून चिंचवड स्टेशन येथील महावीर चौकातून लोकमान्य रुग्णालयाकडे जाण्यासाठी रेल्वे मार्गावर उड्डाण पूल आहे. त्यातील एका चिंचवडगावच्या दिशेने जाणाऱ्या पुलाचे आयुष्य संपले आहे. तर, लोकमान्य रुग्णालयाकडून महावीर चौकात येणाऱ्या पुलास केवळ २० वर्षे झाले आहेत.

त्यामुळे केवळ जुना पूल पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. त्या पुलावर ओपन वेब गर्डर असणार आहेत. त्यामुळे अधिक उंचीचे तसेच, अवजड वाहनांना तेथून प्रवेश बंदी असेल. तो ५३८ मीटर लांबीचा पूल असणार आहे. लोकमान्य रुग्णालयाच्या बाजूने आणि महावीर चौकाच्या बाजूने असे दोन भुयारी मार्ग नव्याने तयार करण्यात येणार आहेत. पुलावरील मार्गिकेची रुंदी ७.५० मीटर असणार आहे.

तर, पदपथ १.५० मीटर रुंदीचा असणार आहे. या कामाची मुदत अडीच वर्षे आहे. ते काम करण्यास रेल्वे विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्रही (एनओसी) मिळाली आहे. या ५५ कोटी ४० लाख रुपये खर्चाची निविदा महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने प्रसिद्ध केली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू केले जाणार आहे. या नव्या पुलामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच काम सुरू करण्याचे नियोजन

चिंचवड स्टेशन येथील रेल्वे उड्डाण पुलावर एका बाजूच्या जुना पूल पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयुक्त तसेच, स्थायी समितीचे मंजुरी घेऊन काम सुरू केले जाईल. त्या पुलामुळे तेथील वाहतूक अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे, असे महापालिकेच्या सहशहर अभियंता संध्या वाघ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT