काही लोकांनी राजकारणाचा गैरफायदा घेतला आहे. जर सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवायच्या असतील तर राजकारणात येणे आवश्यक आहे.
Pimpri Chinchwad Municipal Election
"निवडणुका येतात. निवडणुका आल्या की आश्वासने दिली जातात. या आश्वासनांवर राजकारण होतं. नेते महापौर होतात. अनेक समित्यांचे अध्यक्षही बनले जातात; परंतु शहरातील मूलभूत गरजांकडे पुन्हा दुर्लक्ष केले जाते. भाजपनेही निवडणूक काळात पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाची केवळ आश्वासने दिली. यातील एकही आश्वासन वास्तवात उतरले नाही. त्यामुळेच आजही शहरातील मूलभूत समस्या कायम आहेत. आता शिवसेना ठाकरे गट निवडणुकीमध्ये दिलेली आश्वासने वास्तवात उतरविणार आहे," असा निर्धार ठाकरे गटाचे युवा नेते चेतन पवार यांनी व्यक्त केला. लोक निवडणुकीला सामोरे जातात तेव्हा तेव्हा तेच मुद्दे घेतले जातात. तेच मूलभूत प्रश्न लोकांपुढे असतात. यावर ठोस उपाययोजना होत नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत चोवीस तास दररोज पाणी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र आज परिस्थिती काय आहे? असा सवाल कर एवढा पाऊस झाल्यानंतरसुद्धा आज शहरात पाण्याची अवस्था सर्वांनाच माहिती आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये तेच मुद्दे पुन्हा घेतले जातील. भाजपने चोवीस तास पाणी देण्याचे केवळ आश्वासन दिले. आता आम्ही पिंपरी चिंचवडकरांना २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाहीही चेतन पवार यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ताथवडे हे गाव २००९ मध्ये समाविष्ट झाले. मात्र येथे कोणत्याही सुविधा नाहीत. पूर्वी जे गाव होते तसेच गाव आहे. फक्त महानगरपालिकेत समावेश झाला आहे. २०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. अनेक विकासकामांची आश्वासने दिली गेली. २०१७ ते २०२५ या काळात कोणताही विकास झालेला नाही. सर्वाधिक भ्रष्टाचार हा भाजपच्या काळात झाला आहे, असा आरोप करत आगामी महानगरपालिका निवडणुकीत जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला तर अनेक विकासकामांचे नियोजन आहे, असेही चेतन पवार यांनी सांगितले.
पाणी, ड्रेनेज व्यवस्था, वीज हेच प्रश्न आजही कायम आहेत. निवडणुका येतात. निवडणुका आल्या की आश्वासने दिली जातात. या आश्वासनांवर राजकारण होतं. नेते महापौर होतात. अनेक समित्यांचे अध्यक्षही बनले जातात. परंतु ज्या मूलभूत गरजा आहेत त्याकडे पुन्हा दुर्लक्ष केले जाते. मात्र शिवसेना ठाकरे गट हा आगामी महापालिका निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्यांच्या विकासासाठी लढत आहे. पिंपरी चिंचवड शहरात क्रीडांगण, जलतरण तलाव, वाहतूक व्यवस्थेची सुधारणा, सरकारी रुग्णालयांची उभारणी यांचे नियोजन आहे. नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यास आमचे प्राधान्य आहे, असेही चेतन पवार म्हणाले.
नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड अध्यक्ष म्हणून काम पाहिले. कॉलेज संपल्यानंतर समाजकारण करताना दैनंदिन जीवनात लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे पाहत होतो. लोकांच्या मूलभूत समस्या सुटाव्यात यासाठी समाजकारणातून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. काही लोकांनी राजकारणाचा गैरफायदा घेतला आहे. जर सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवायच्या असतील तर राजकारणात येणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड शिवसेना ठाकरे गटाच्या शहर पदाधिकारीपदी नियुक्ती झाल्यानंतर तात्काळ सदस्य नोंदणी सुरू केली. तब्बल ५०० युवकांनी तात्काळ नोंदणी केली. यातून एक टीम तयार करण्यात आली. या नोंदणीवेळी पिंपरी चिंचवडमधील नागरिकांच्या समस्यांची माहिती झाली. आता याच समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका निवडणूक लढविणार असल्याचेही चेतन पवार यांनी स्पष्ट केले.
काही काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी झाल्या. यानंतर पिंपरी चिंचवड मतदारसंघातील शिवसेनेचा मतदार कायम आहे. लोकसभा निवडणुकीत संजोग वाघेरे पाटील यांना पिंपरी चिंचवड शहराने भरघोस मतदान केले होते. चिंचवड मतदारसंघात तब्बल १ लाख १४ हजार लोकांनी शिवसेनेला मतदान केले. पिंपरी मतदारसंघात ७६ हजार लोकांनी शिवसेनेला मतदान केले होते. नेते येतात-जातात, नेते पक्ष बदलतात; मात्र नेते स्वतःचा विकास करण्यासाठी पक्षांतर करतात. शिवसेनेचा आजही मतदार ठाम आहे, असा विश्वासही चेतन पवार यांनी यावेळी व्यक्त केला.