Holi Market Pudhari
पिंपरी चिंचवड

Charholi Holi Market: चऱ्होली बाजारपेठेत रंगोत्सवाची धूम; पिचकारी-गनना मोठी मागणी

धुलिवंदन-रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर ३० ते १६०० रुपयांपर्यंत विविध रंगसाहित्य उपलब्ध, बालचमू व तरुणाईत उत्साह

पुढारी वृत्तसेवा

चऱ्होली: भारतीय संस्कृतीत विविध सणसमारंभांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. वसंतऋतू आणि रंगोत्सव यांचे समीकरण अगदी प्राचीन काळापासून अगदी घट्ट आहे. यंदा वसंतारंभ झालाच आहे. आता होलिकोत्सव, धुलिवंदन आणि रंगपंचमीदेखील दोन दिवसांवर आली आहे. चऱ्होलीच्या बाजारपेठेतदेखील या रंगोत्सवाच्या रंगछटा उमटू लागल्या आहेत.

मुख्य बाजारपेठेत दुतर्फा विविध रंगांच्या राशी लागलेल्या आहेत. लहान मुलांना रंग खेळण्यासाठी विविध प्रकारच्या रंगांच्या पिचकारी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये काळानुरूप बराच बदल झाला आहे. विविध प्रकारच्या गन (रंग बंदुका) एकमेकांच्या अंगावर रंग उडविण्यासाठी यंदा उपयोगात येणार आहेत.

या रंग उडवण्याच्या गनदेखील बालचमूंचे मन आकर्षित करून घेतील अशा विविध स्वरूपाच्या आकारात आणि प्रकारात उपलब्ध आहेत. रंगांचे देखील यंदा बरेच प्रकार आहेत. काही रंग हाताने लावण्याजोगे आहेत काही रंग गनच्या माध्यमातून अंगावर उडवता येतील अशा प्रकारचे आहेत. काही रंग ट्यूबमध्ये पेस्ट स्वरूपात आहेत. त्यामुळे कमी वेळात रंगवता येणार आहे. शिवाय खिशात सहजपणे ट्यूब घेऊन रंग खेळता येण्याची सोय आहे.

यंदा विविध गनरूपी पिचकाऱ्यांबरोबर रंग भरून घेण्यासाठी विविध प्रकारचे टॅंकदेखील बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे रंग भरण्यासाठी पुन्हा पुन्हा माघारी वळण्याची आवश्यकता नाही. एकदा टॅंकमध्ये रंग लोड करून घेतला की भरपूर वेळ रंग खेळण्याची मजा अनुभवता येणार आहे. त्यामुळे रंग खेळण्याचे आनंदात सलगता येणार असून, खंड पडणार नाही.

त्यामुळे रंग खेळण्याचा आनंद द्विगुणित होणार आहे. विविध रंगांचे लहान फुगेदेखील उपलब्ध आहेत या फुग्यांमध्ये रंग भरून अगदी मसैराट स्टाईलफ मध्ये एकमेकांच्या अंगावर मारता येणार आहेत. आणि त्या माध्यमातून कमी वेळेत एकमेकांना रंगवता व रंगांमध्ये भिजवता येणार आहे.

यंदा धुलिवंदन आणि रंगपंचमीसाठी अगदी 30-40 रुपयापासून 1500/1600 रुपयांपर्यंतच्या विविध स्वरूपातील नवीन प्रकारच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे रंगांची उधळण करताना लहान मुलांना आणि तरुणाईला भरपूर आनंद घेता येणार आहे.
मल्लशेठ चौधरी, दुकानदार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT