Vadapav Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Vadapav Price Hike: भोसरीत वडापाव महाग; दरवाढीचा खवय्यांच्या खिशाला फटका

उत्पादन खर्च वाढल्याने वडापावचे दर वाढले; विद्यार्थी व चाकरमान्यांना आर्थिक ताण

पुढारी वृत्तसेवा

भोसरी: विद्यार्थी, खवय्ये तसेच चाकरमानी वर्गासाठी नेहमीच स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेला वडापाव आता महाग झाल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. वडापावच्या दरात 3 ते 5 रुपयांची वाढ झाल्यामुळे अनेकांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम होत आहे. परिणामी ग््रााहकांच्या खिशाला फटका बसत आहे.

सर्वांचा आवडता आणि परवडणारा फास्टफुड वडापाव आता महाग झाला आहे. शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी आणि कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वडापाव हा जलद, स्वस्त आणि पोटभरणारा पर्याय मानला जात आहे. कमी वेळेत आणि कमी खर्चात मिळणारा वडापाव अनेकांचा रोजचा आधार असतो. परिसरातील अनेक भागातील वडापाव विक्रेत्यांनी वडापावच्या दरात वाढ केली आहे. वाढलेल्या दरांमुळे हा पर्याय आता थोडा महाग वाटू लागला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

उत्पादन खर्चवाढीचा परिणाम

गॅस टंचाईचा पार्श्वभूमीवर काही दिवसांत वडापावच्या किमतीत 3 ते 5 रुपयांची वाढ करण्यात आली असून, स्वस्त आणि पोटभर खाण्यासाठी अनेकांचा पर्याय असल्याने आता तोही महाग झाला आहे. यामुळे ग््रााहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. विशेषतः कामगार, विद्यार्थी आणि दैनंदिन उत्पन्नावर जगणाऱ्या नागरिकांसाठी ही दरवाढ चिंतेची बाब ठरत आहे. गॅसटंचाई, वाढलेले एलपीजी दर तसेच कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे.

त्यामुळे नाइलाजास्तव वडापावच्या किमती वाढवाव्या लागल्या आल्याचे विक्रेते सांगत आहेत. परंतु ग््रााहकांनी या दरवाढीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दररोजचा खाऊ म्हणून वडापाव घेत होतो, पण आता खर्च वाढतो आहे अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिली. चाकरमानी वर्गालाही या वाढीचा फटका बसत असून, काहींनी पर्यायी स्वस्त खाद्यपदार्थांकडे वळण्यास सुरुवात केली असल्याचे ते सांगतात.

महागाईच्या कचाट्यात सापडला वडापाव

सध्या शहरात वडापाव 15 ते 25 रुपयांच्या दरम्यान विकला जात असून, परिस्थिती अशीच राहिली तर दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा हा लोकप्रिय पदार्थ आता हळूहळू महागाईच्या कचाट्यात सापडणार तर नाही ना, असा विचार नागरिकांच्या मनात घर करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT