Latest

पीएम मोदींच्या उपस्थितीत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये ‘गुप्तगू’

backup backup

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे मेट्रो प्रकल्पाच्या लोकार्पण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या शेजारी बसले होते. विशेष म्हणजे या दोघांमध्ये या समारंभावेळी 'गुप्तगू' सुरू होती. त्यामुळे पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये नक्की काय चर्चा सुरू होती याचीच चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.

पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रो प्रकल्पासह विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. कोथरूड येथील एमआयटीच्या प्रांगणात झालेल्या या समारंभाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्यपाल भगत सिंह कोशारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस उपस्थित होते.

या कार्यक्रमात पवार आणि फडणवीस यांची आसन व्यवस्था शेजारीच होती. त्यामुळे कार्यक्रम सुरू झाल्यानंतर हे दोघेही अनेकवेळा एकमेकांच्या कानात गुप्तगू करत असल्याचे अनेक वेळा पहायला मिळाले. त्यामुळे उपस्थितांच्या नजराही त्यांच्यावरच खिळल्या होत्या.

पहाटेच्या शपथविधीपासून पवार आणि फडणवीस एकत्र आल्यानंतर पुन्हा राजकिय चर्चांना सुरवात होते. मेट्रो प्रकल्पाच्या समारंभात हेच चित्र पुण्यात बघायाले मिळाले.

हे ही वाचलं का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT