

पुणे :
राज्यातील काही भागांत रविवारपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. मात्र, 25 पासून पुन्हा सर्वत्र उष्णतेची लाट सुरू होणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
राज्यातील काही भागांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे काही भागांत उन्हाचा कडाका कमी झाला. असा पाऊस रविवारच्या दिवशी राज्याच्या काही भागांत राहील.