पुणे : पीएम मोदींविरोधात अलका चौकात निदर्शने; काँग्रेससह अनेक संघटनांचा कडाडून विरोध | पुढारी

पुणे : पीएम मोदींविरोधात अलका चौकात निदर्शने; काँग्रेससह अनेक संघटनांचा कडाडून विरोध

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन तसेच पुण्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ आज (दि.०६) होणार आहे. पंतप्रधान मोदी यांचे दुपारी पावणे बारा वाजता कार्यक्रमस्थळी आगमन होणार आहे. दरम्यान मोदींच्या दौऱ्याविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आंदोलन सुरू केले आहे. पुण्यातील अलका चौकात काँग्रेसचे तर पुणे रेल्वे स्थानका समोर राष्ट्रवादीच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करत विरोध केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या विकास कामांचे उदघाटन करत आहेत त्या कामांचा निधी काँग्रेसच्या सत्ता काळात मंजूर झाल्याची टीका काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. याचबरोबर पोलिसांनी चोख बंदोबस्तही ठेवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला येणाऱ्या लोकांसाठी काळा रंग वर्ज्य

मोदींच्या एम आय टी महाविद्यालयातील सभेला येणाऱ्या लोकांसाठी काळा रंग बंधनकारक करण्यात आला आहे. ज्यांनी काळ्या रंगाचा शर्ट घातला असेल त्यांना तो काढण्यास सांगण्यात येत आहे. एवढंच नाही तर ज्यांनी शर्टच्या आतमधे काळ्या रंगाचा बनियन आणि पायात काळ्या रंगाचे मोजे घातले, असतील त्यांनाही ते काढण्यास सांगण्यात आले आहे. काळ्या रंगाचा मास्कही काढून टाकण्यास सांगण्यात आले. मोदींच्या सभेत काळ्या रंगाचा उपयोग करून कुणी निषेध करु नये यासाठी हे करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

या कार्यक्रमासाठी नागरिकांनी सकाळी नऊपासून सभामंडपात जागा घेण्यास सुरुवात केली. अनेक जण रांगा लावून एम आय टी कॉलेजच्या उभारलेल्या भव्य शामियानामध्ये प्रवेश करीत होते. त्या ठिकाणी विविध स्क्रीन लावलेले आहे. मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा, संबंधित प्रकल्पाची माहिती दृकश्राव्य माध्यमाद्वारे देण्यात येत आहे.

Back to top button